Monday 17 October 2016

अर्जुनी मोरगाव तालु्क्यात दोन शिक्षक निलंबित

अर्जुनी-मोरगाव,दि.17 : पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या बोरटोला येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक डी.एम. लोणारे व खडकी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक डी.व्ही. गोबाडे यांना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. सी.एल. पुलकुंडवार यांनी निलंबित केले आहे.
निलंबित शिक्षकांवर अनाधिकृतपणे गैरहजर राहणे, शैक्षणिक कार्य सुरळीत पार न पाडणे, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान, वरिष्ठांच्या आदेशाची अवहेलना करणे, पदाच्या कर्तव्याचा भंग करणे यामुळे प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राची अंमलबजावणी प्रभावीपणे होऊ शकत नाही. या कारणावरुन महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (वर्तणूक) नियम ३९६७ मधील ३ अन्वये आपले कर्तव्य बजावित असताना नियमाचा भंग केल्यामुळे शिस्तभंगाची कारवाई प्रस्थापित केली आहे.
दोन्ही शिक्षकांविरुद्ध महाराष्ट्र जिल्हा परिषदा जिल्हा सेवा (शिक्षा व अपीली नियम १९६४ चे नियम ३ मधील तरतुदीनुसार तात्काळ प्रभावाने निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यांना निलंबन काळात पंचायत समिती सालेकसा हे मुख्यालय देण्यात आले आहे.
पंचायत समितीचे सभापती अरविंद शिवणकर यांनी शालेय वेळात कर्तव्यात कसूर करणार्‍या कर्मचार्‍यांविरुद्ध राबविलेल्या कडक मोहिमेमुळे कामचुकार कर्मचार्‍यांमध्ये धडकी भरली आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...