Wednesday 19 October 2016

एमआरईजीएस कामात भ्रष्टाचार

गोरेगाव,दि.19 : तालुक्यातील बघोली येथील एमआरईजीएसचे खडीकरण व माती रस्ता बांधकाम निकृष्ठ दर्जाचे आहे. या कामात बोगस काम करुन शेतकर्‍यांच्या शेतीचे कोणतेही कागदपत्र न लावता या कामाला मंजुरी देऊन बोगस मजूर दाखवून मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप बघोलीचे माजी सरपंच महेंद्र चौधरी यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनातून केला आहे.
प्राप्त माहितीनुसार, प्रेमकला नामदेव मेश्राम अंगणवाडी मदतनीस असून यांचे मस्टर क्रमांक ४७५0 अनु.क्र.६ व दुसरे मस्टर क्रमांक ३१६२ अनु.६, तिसरे मस्टर क्र.४१२८ अनु.६ यांचे बँक खाते क्रं.२५0१७१४११४३ बँक ऑफ महाराष्ट्र गोरेगाव येथे आहे. मेश्राम या अंगणवाडीच्या मदतनीस असूनही एमआरजीएसच्या कामावर कशा? असा प्रश्न चौधरी यांनी उपस्थित केला आहे.
खडीकरण व पांदण रस्त्याच्या कामावर गाडीचे ड्रायव्हर, सेंट्रींग ठेकेदार, ग्रामपंचायत सदस्य, ऑटोचालक यांना एमआरईजीएसच्या कामावर असल्याचे दाखविण्यात आले आहे. काही लोक नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया येथे वास्तव्यास असून सुद्धा त्यांच्या नावावर रकमेची उचल करण्यात आल्याचा चौधरी यांचा आरोप आहे.
या सर्वप्रकरणात ग्रामपंचायत पदाधिकारी, रोजगारसेवक, अभियंता यांनी संगणमत करुन मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे. तरी वरिष्ठ अधिकार्‍यांनी चौकशी करुन दोषींवर कारवाईची गावकर्‍यांची मागणी आहे. या प्रकरणाला घेऊन चौधरी यांनी खासदार प्रफुल पटेल यांच्याकडेही काही दिवंसापूर्वी तक्रार केली आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...