Thursday, 6 October 2016

हाजराफॉलच्या प्रसिद्धीसाठी स्थानिक माध्यमांना डावलून वनविभागाची नागपूरकडे धाव

गोंदिया,दि.06 : जिल्ह्यात मोजकेच पर्यटन स्थळ आहेत. त्यांना नावारुपास आणण्याकरिता स्थानिक प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी गेल्या कित्येक वर्षापासून प्रयत्न चालविलेच नव्हे तर चांगली प्रसिध्दी ही मिळवून दिली आहे. त्यांच्या प्रयत्नांचे जीच झाले. अखेर जिल्हा प्रशासन आणि वनविभागाची नजर त्या पर्यटन स्थळांकडे वळली. पर्यटक आकर्षित होवू लागले. मात्र, आता गोंदिया वनविभागाने पर्यटन स्थळे नावारुपास आल्यानंतर स्थानिक प्रसारमाध्यम प्रतिनिधींना डावलण्याचे काम वनविभागाच्या उपवनसरंक्षक कार्यालयाने सुरू केले.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...