Thursday, 6 October 2016

पंतप्रधान नवाज शरीफ यांनी मोदींना चुकीचे संकेत दिले.


इस्लामाबादः माजी क्रिकेटपटू आणि तेहरिक-ए-इन्साफ या पक्षाचे अध्यक्ष इम्रान खान यांनी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यावर शाब्दिक हल्ला केला आहे. पंतप्रधान शरीफ यांच्यामुळेच भारताने पाकिस्तानमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक केल्याचा आरोप त्यांनी केला. पंतप्रधान नवाज शरीफ यांनी मोदींना चुकीचे संकेत दिले नसते, तर ही परिस्थिती निर्माण झाली नसती, असे इम्रान खान यांनी म्हटले. नवाज शरीफ पाकिस्तानी जनतेच्या जीवावर उधळपट्टी करत असून जनतेचे नुकसान करत असल्याचेही त्यांनी सांगितले. पाकिस्तानच्या नुकसानास कारणीभूत असणाऱ्या शरिफांना मी पंतप्रधान मानत नसल्याचे इम्रान खान यावेळी म्हणाले.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...