Thursday, 1 August 2019

आईजवळ झोपलेल्या मुलीचं अपहरण; दिवसभर बलात्कारानंतर शीर केलं धडावेगळं


Child Kidnapped From Jamshedpur railway Station Then Raped And Beheaded | धक्कादायक! आईजवळ झोपलेल्या मुलीचं अपहरण; दिवसभर बलात्कारानंतर शीर केलं धडावेगळं
जमशेदपूर,दि.01: उन्नावमधील बलात्काराच्या घटनेची शाही वाळते न वाळते तेच आता झारखंडमध्ये घडलेल्या घटनेमुळे संपूर्ण देश प्रचंड हादरला आहे. एका तीन वर्षीय मुलीचं अपहरण करुन तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना जमशेदपूरमध्ये घडली. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.  मात्र मुलीचं शीर धडावेगळं का केलं, याचं उत्तर त्यांनी अद्याप दिलेलं नाही.
 रिंकू साहू आणि कैलाश या दोन तिशीतल्या तरुणांनी रेल्वे स्थानकातून एका तीन वर्षीय मुलीचं अपहरण केलं. आईच्या शेजारी झोपलेल्या मुलीचं अपहरण होत असतानाची घटना सीसीटीव्हीत कैद झाली. यानंतर पोलिसांनी रिंकू आणि कैलासला अटक केली. त्यानंतर त्यांनी तिच्यावर बलात्कार केला. रिंकू आणि कैलास यांनी बलात्कारानंतर संबंधित मुलीचा मृतदेह एका प्लास्टिकच्या पिशवीत भरला आणि तो जमिनीत पुरला. आरोपींनी स्वत:हून ही जागा रेल्वे पोलिसांना दाखवली. पोलिसांनी मृतदेहाचे इतर भाग श्वान पथकाच्या मदतीनं शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र मुसळधार पावसामुळे त्यात त्यांना यश आलं नाही. 


No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...