देवरी, दि.14 - आंतरराष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून स्थानिक मनोहरभाई पटेल महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना आणि ग्रामीण रुग्णालयाच्या आयसीटीसी विभागाच्या संयुक्त विद्यमाने एड्स रोगाविषयी जाणीवजागृतीसाठी नुकतीच रेड रिबन क्लबची स्थापना करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. अरुण झिंगरे हे होते. यावेळी प्रा. देवेंद्र बिसेन आणि आयसीटीसीचे प्रमोद कळमकर हे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी अध्यक्षस्थानावरून उपस्थितांना मार्गदर्शन करताना प्रा. झिंगरे यांनी युवकांनी एड्स सारख्या भयानक रोगाशी लढण्यासाठी युवकांनी सदैव तत्पर राहण्याचे आवाहन करून युवा दिनाच्या शुभेच्छा दिल्या. श्री. कळमकर यांनी सुद्धा या गंभीर आजारावर विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी स्थापन करण्यात आलेल्या क्लबमध्ये 10 विद्यार्थ्यांसह 5 विद्यार्थिनींचा सुद्धा समावेश करण्यात आला. अंशुल अमृतकर याची अध्यक्षपदी वर्णी लागली. यासाठी रासयो कार्यक्रम अधिकारी प्रा. सुनीता रंगारी आणि सहकार्यक्रम अधिकारी प्रा. आशिष गडवे यांनी मोलाची कामगिरी बजावली.
संचलन प्रा. रंगारी यांनी केले. उपस्थितांचे आभार प्रा. गडवे यांनी मानले.
No comments:
Post a Comment