पुणे,दि.03:येथील जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाच्या झालेल्या त्रैमासिक सभेत जुनी पेन्शन, 7 व्या वेतन आयोगाच्या केंद्रप्रमाणे वाहतूक, घरभाडे, हॉस्टेल भत्ता, महिलांना 2 वर्षाची बालसंगोपन रजा, 60 वर्ष वय, 5 दिवसाचा आठवडा, आगाऊ वेतनवाढ, विविध संवर्गाच्या वेतनतृटी सुधारणा खंड 2 प्रकाशित करणे, मासिक किमान वेतन 18000/- रु, रिक्त पदे भरणे, कंत्राटी कर्मचाऱ्यांना प्राधान्याने सेवेत नियमित करणे, आदिवासी जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांना कालबद्ध शिवाय स्वतंत्र एकस्तर वेतनश्रेणी लागू करणे, 7 व्या वेतन अयोगानुसार आदिवासी प्रोत्साहन भत्याची परिगणना करणे, इत्यादी मागन्याबाबत 20 ऑगस्ट 2019 रोजी समन्वय समितीने पुकारलेल्या संपात सहभागी होण्याच्या निर्णयाचा ठराव एकमताने संमत करण्यात आला.सभेच्या अध्यक्षस्थानी महासंघाचे अध्यक्ष उमेशचंद्र चिलबुले होते.यावेळी राज्य कोषाध्यक्ष अशोक शंभरकर, विभागीय उपाध्यक्ष नंदकिशोर ठाकूर, कैलासचंद्र वाघचौरे, अतुल वर्मा, काका पाटील, प्रज्ञा तायडे, ग्रामसेवक युनियनचे राज्याध्यक्ष एकनाथ ढाकणे अहमदनगर, नर्सेस संघटनेच्या राज्याध्यक्ष श्रीमती शोभाताई खैरनार नाशिक,गोंदियाचे पी.जी.शहारे मंचावर उपस्थित होते.
विशेष म्हणजे महासंघाच्या त्रैमासिक बैठकित गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ.राजा दयानिधी यांच्या कार्यप्रणालीचा निषेध नोंदविण्यात येऊन त्यांनी संप काळातील तीन दिवसाचे कपात केलेल्या वेतनासंदर्भात मुख्यसचिवाकडे पाठपुरावा करण्यासोबतच गोंदिया जिल्हा परिषदेत कर्मचारी महासंघाला मान्यता देत नसल्याबाबद मुख्यसचिवांकडे तक्रार करण्याचा निर्णय घेत त्यांच्या अशा गैरकृतींचा सभागृहात निषेध व्यक्त करण्यात आला. बैठकित लिपिकांची वेतनत्रुटी , ग्रामसेवकांची वेतनत्रुटी व इतर प्रश्नावर 9 अगस्ट पासून होऊ घातलेला संप, चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे पदोन्नतीचे प्रश्न, नर्सेसचे दोन एल एच व्ही पदे पुनर्जीवित करणे, विस्तार अधिकारी आरोग्य पदावरून गट ब मध्ये पदोन्नती, अंगणवाडी पर्यवेक्षिका गट ब पदोन्नती, वाहन चालकांच्या वेतन त्रुटी सुधारणा, गट ब च्या सर्व विभागातील पदोन्नती, विस्तार अधिकारी पंचायत 20 ग्रामपंचायत मागे एक, समाजकल्याण मधील पदे पुनर्जीवित करणे व वेतन भत्त्यांची तरतूद करणे, MSRLM कडील पदाना कायम ठेवून समायोजित करणे, अनुकम्पा आरक्षण अट आणि वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती मधील जाचक अटी रद्द करणे, 50 ते 55 वर्षमधील कर्मचाऱ्यांची क्षमता तपासण्याच्या शासन निर्णयातून महिलांना सक्षम प्राधिकरण कडून त्रास होणार याची संभाव्यता व कर्मचाऱ्यचे शोषण होईल त्यामुळे या निर्णयाचे फेरविचार करण्याबाबत निर्णय घेण्यात आले.बैठकिला राष्ट्रीय सदस्य तथा ग्रामसेवक युनियनचे राज्य सरचिटणीस प्रशांत जामोदे, राष्ट्रीय सदस्य तथा लिपिक संघटनेचे अध्यक्ष शालीक माऊलीकर चंद्रपूर, विस्तार अधिकारी संघटनेचे राज्याध्यक्ष वसंतराव वाघमारे, अंगणवाडी पर्यवेक्षिका संघटनेच्या राज्यध्यक्षा मंगला भवर, चतुर्थ श्रेणी संघटना राज्याध्यक्ष सुरेश कदम वाहनचालक संघटना राज्याध्यक्ष सर्जेराव चव्हाण सोलापूर पशु चिकित्सा व्यवसायी संघटना: डॉ भगवान पाटील, विभागीय सहसचिव- उज्वल भामरे धुळे, संजय म्हाळणकर, तथा राज्याध्यक्ष जिल्हा परिषद लेखा कर्मचारी संघटना डी.एस, पाटील सांगली सरचिटणीस आरोग्य औषध निर्माता अधिकरी संघटना, मंगला मेश्राम नागपूर आरोग्य महिला परिचर महासंघ, संजय खोकले गडचिरोली उपाध्यक्ष हातपंप अभियांत्रिकी संघटना, रमाकांत साळुंखे, यांच्यासह अनेक प्रवर्ग संघटनांचे आणि अनेक जिल्हा महासंघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सभेच्या शेवटी अध्यक्षांनी चर्चेला उत्तर दिले. पुणे जिल्हा कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष चंद्रकांत जगताप यांनी आभार मानले.
सभेतील महत्वाचे ठराव व निर्णय
● राष्ट्रीय कार्यकारिणी आढावा व मागील काळातील राज्य महासंघाचा कार्य अहवाल आणि केंद्र व राज्य सरकारचे कर्मचार्याविरुद्ध धोरण याबाबत सविस्तर मार्गदर्शन.
● नाशिक महासंघाने दोन महिन्यात प्रत्येक तालुक्यात केलेल्या महासंघाची स्थापना सर्वासाठी आदर्श पथदर्शी असल्याने नाशिक जिल्हा महासंघाचा अभिनंदनाचा ठराव पारित करून उपस्थित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
● पुणे जिल्हा महासंघाच्या अध्यक्षपदी चंद्रकांत जगताप यांची निवड मागील महिन्यात झाल्यानंतर त्यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या व ग्रामसेवक युनियनच्या सहकार्यानी राज्य कार्यकारिणी आयोजित करून उत्कृष्ट व नेत्रदीपक व्यवस्था केल्याबद्दल सर्वानी स्तुती केली, याबद्दल सर्व पुणे पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
● रत्नागिरी जिल्ह्यात लिपिक संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष संजय नलावडे यांनी 3956 च्या शाखा प्रत्येक तालुक्यात बांधून संघर्षाची ज्योत पेटवली त्याबद्दल त्यांच्याही कार्याचा गौरव जरून सत्कार करण्यात आला.
● धुळे जिल्हा परिषद कर्मचारी पतपेढी वर महासंघ प्रणित 15 पैकी 15 संचालक निवडून येऊन नाशिक विभागाचे सहसचिव उज्वल भामरे यांची चेअरमनपदी निवड झाल्या बद्दल धुळे महासंघाच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
● राष्ट्रीय उपक्रम वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, पाणलोट, पाणी आडवा, वनराई बंधारे, बेटी बचाव- बेटी पढाव,इत्यादी बाबत अध्यात्मिक प्रबोधन दिंडी ग्रामसेवक युनियनच्या राज्यध्यक्ष यांनी मागील दोन वर्षांपासून आषाढी वारी सुरू केली त्याबद्दल त्यांच्या ह्या लक्षवेधी कार्याचे गौरव करून त्यांचे अभिनंदन.
● राज्य महासंघाच्या महिला उपाध्यक्षपदी नर्सेस संघटनेच्या राज्यध्यक्षा श्रीमती शोभाताई खैरनार नाशिक आणि अखिल भारतीय राज्य सरकारी महासंघाच्या महिला समितीच्या राष्ट्रीय महिला सदस्यपदी श्रीमती संगीता गायकवाड नागपूर यांची सभागृहाने एकमताने निवड केली.
● गोंदिया मुख्य कार्यकारी अधिकारी हे महासंघाला मान्यता नाही या सबबीमुळे चर्चा करत नाही याबाबत मुख्यसचिवांकडे तक्रार करावी व त्यांच्या अशा गैरकृतींचा सभागृहात निषेध व्यक्त करण्यात आला.
● दि 7, 8 व 9 ऑगस्ट 2019 च्या संपात वेतन कपात करण्यात आली त्यांची साधारण रजा मंजुरीसाठी पाठपुरावा, हातपंप देखभाल व दुरुस्ती कर्मचाऱ्यांचे वेतन शासन निधीतून द्यावे,
याबाबत ठराव संमत करण्यात आले.
No comments:
Post a Comment