Wednesday, 14 August 2019

संततधार पावसामुळे घरांची पडझड,तर अर्जुनी मोरगावात रस्ते बंद


गोंदिया,दि.14ःजिल्ह्यात गेल्या चार पाच दिवसापासून पावसाने चांगलेच पुनरागमन केले असून जिल्ह्यात पावसाची संततधार कायम आहे. दरदिवशी तालुक्यात पावसाच्या सरी बरसत असल्याने घरांची मोठ्याप्रमाणात पडझड सुरु झालेली आहे.सोमवारच्या रात्री कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे अर्जुनी मोर तालुक्यातील केशोरी व महागाव या दोन मंडळात अतवृष्टीची नोंद करण्यात आली होती.सततच्या पावसामुळे इटखेडा ते सिरोली व बोरी ते कोरंभीटोला हा रस्ता बंद झालेला आहे.तर 100 च्या वर घऱांची पडझड जिल्ह्यात झाली आहे.त्यातच नदीकाठावरील गावांना सतकर्तेचा इशारा देण्यात आला असून पुरस्थिती उदभवू नये यासाठी पुजारीटोला धरणातून परिस्थीतीनुसार पाणी सोडले जात आहे.
मंगळवारला अर्जुनी मोर तालुक्यातील महागाव महसूल मंडळात ६८.४0 तर केशोरी महसूल मंडळात ६५.२0 मिमी सरासरी पाऊस पडला असून या दोन्ही मंडळात अतवृष्टीची नोंद करण्यात आली होती.आज बुधवारला जिल्ह्यात 65.51 मिमी पावसाची सरासरी नोंद करण्यात आली आहे. जिल्हयातील गोरेगाव,अर्जुनी मोरगाव,सडक अर्जुनी व तिरोडा तालुक्यात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली.  गोरेगाव तालुक्यात67.40 मिमी सरासरी पावसाची नोंद करण्यात आली तर अजुर्नी मोर तालुक्यात 72.96 मिमी, सालेकसा 47.27 मिमी, सडक अर्जुनी तालुक्यात 72.53 गोंदिया तालुक्यात 49.57 मिमी, तिरोडा 116 मिमी, देवरी 35.70 मिमी तर आमगाव तालुक्यात 50.35 मिमी सरासरी पावसाची नोंद करण्यात आली आहे. तिरोडा तालुक्यातील कवलेवाडा येथे 5,बेलाटी 2,चांदोरी खुर्द 1,नवेगाव खुर्दे 3,केसलेवाडा 6,मनोरा 1 घर तर बिर्सी, व लाखेगाव येथे गोठा पुर्णत पडला.तर विहीरगाव येथे घराची भिंत कोसळली तर प्रभू पाटील यांचा गोठा पडला.काचेवानी येथे 3,बेरडीपार 5,डब्बेटोला येथे 1 घर पडले आहे. सडक अर्जुनी तालुक्यातील डोंगरगाव येथे 2 घरे खडकी येथे ३ घरे पडल्यामुळे नुकसान झाले आहे. अर्जुनी मोरगाव तालुक्यात पडलेल्या घरांची संख्या -2 व अंशतः पडलेल्या घरांची संख्या-62 एवढी झाली आहे. 

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...