देवरी /चिचगड: 13- युनो ने घोषित केलेला जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात चिचगड येथे साजरा करण्यात आला.
शा.आ.मुलांचे व मुलींचे वसतिगृह चिचगड तसेच समस्त आदिवासी समाज बांधव चिचगड,ग्राम पंचायत चिचगड,पोलीस विभाग चिचगड,श्रीराम विद्यालय चिचगड,छत्रपती प्रतिष्ठान चिचगड,पाणी फाउंडेशन चिचगड तसेच सर्व आदिवासी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांचे संयुक्त विध्यमाने चिचगड येथिल बिरसा मुंडा स्मारक येथे जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष राष्ट्रपती शौर्य पुरस्कार प्राप्त अतुल तावाडे,ठाणेदार पोलीस स्टेशन चिचगड हे होते तर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे जि.प.उपाध्यक्ष अल्ताफ हमीद तर प्रमुख उपस्थिती मध्ये गावचे प्रथम नागरिक सरपंच कल्पना गोस्वामी, देवरी चे बीडीओ मनोज हिरडकर, केंद्र प्रमुख कोल्हारे, माजी उपसरपंच ललीतकुमार भैसारे,श्रीराम विद्यालयाचे शिक्षक उमेश गिरी, अतुल ढाले, बी.डी.कुंजाम, देविदास धानगाये,छत्रपती प्रतिष्ठान चे विवेक बिसेन उपस्थित होते.*
*जि.प.उपाध्यक्ष अल्ताफ हमीद यांनी जागतिक आदिवासी दिनाचे महत्व आणि शासनाचे आदिवासी साठीचे कार्य सांगितले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष ठाणेदार अतुल तावाडे यांनी आदिवासी समाजाचे संस्कृती, परंपरा आणि जल जंगल जमीन या बदल आदिवासी यांची बांधीलकी या बदल विवेचन केले.
कार्यक्रमाचे संचालन शा. आ.मुलांचे व मुलींचे वसतिगृह चिचगड येथील गृहपाल के.बी.देशकर यांनी केले तर कार्यक्रमाचे समारोप अजय सलामे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वसतिगृहाचे कर्मचारी पदमीनी राठोड, रमेश राऊत, ए. डी. राठोड आणि दोन्ही वसतिगृहाच्या विद्यार्थ्यांनी अथक प्रयत्न केले.
No comments:
Post a Comment