तिरोडा,दि.0१ः-येथील अदानी पॉवर प्लांटसमोर मिनी ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना ३१ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली.
विष्णू प्रेमलाल भगत (४५) व दिनेश क्षीरसागर (४८) रा. कवलेवाडा असे मृतकांचे नाव आहे. विष्णू व दिनेश हे बेरडीपार येथील तेरवीचा कार्यक्रम आटपून दुचाकीने (एमएच ३५/बीवाय ३४८१) कवलेवाडाकडे जात असताना अदानी पॉवर प्लाँटसमोर समोरुन आलेल्या ट्रकने (एमएच ३५/एजे 0६८२) दुचाकीला धडक दिली. यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला, तर ट्रक देखील रस्त्यावर पलटला. घटनेनंतर ट्रकचा चालक फरार झाला. याप्रकरणी तिरोडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक लोणकर करीत आहेत.
No comments:
Post a Comment