Saturday, 3 August 2019

शिवसेनेकडून विरोधी पक्षनेत्याला फोडण्याचा डाव, वडेट्टीवारांना ऑफर!



Shiv Sena offers to show opposition to party leader; | शिवसेनेकडून विरोधी पक्षनेत्याला फोडण्याचा डाव, वडेट्टीवारांना ऑफर!
नागपूर,दि03: भाजपत सध्या विरोधी पक्षातील नेत्यांची मेघाभरती सुरू आहे. यात शिवसेनेने देखील काही नेत्यांसाठी गळ टाकून आहे. कॅबिनेट मंत्री पदाचे प्रलोभन दाखवून मला शिवसेनेत येण्याची आॅफर देण्यात आली होती, असा गौप्यस्फोट विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत केला.

वडेट्टीवार म्हणाले, शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी मला २५ वेळा फोन केले. यातील २३ वेळा मी फोन उचलला नाही. त्यांनी मला शिवसेनेत येण्याची ‘आॅफर’ दिली. तुमच्या येण्यामुळे आम्ही परत सत्तेत येऊ. तुम्हाला कॅबिनेट मंत्रिपद देण्यात येईल, असे प्रलोभनदेखील दिले. मात्र माझी भूमिका स्पष्ट आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...