Tuesday, 13 August 2019

महाराष्ट्रातील 11 पोलीस अधिकारी-कर्मचा-यांना ‘विशेष पोलीस पदक’पुरस्कार जाहीर

महाराष्ट्रातील 11 पोलीस अधिकारी-कर्मचा-यांना विशेष पोलीस पदक;उपअधिक्षक आणि दोन महिला पोलीस कर्मचा-यांचा समावेश

नवी दिल्ली,13 : केंद्रीय गृहमंत्रालयाने उत्कृष्ट तपासकार्यासाठी देशातील 96 पोलीस अधिकारी- कर्मचा-यांना विशेष पोलीस पदक जाहीर केले असून महाराष्ट्रातील 11 पोलीस अधिकारी कर्मचा-यांचा यात समावेश आहे.पोलिसांमध्ये तपास कार्याबद्दल उच्च व्यावसायिक दृष्टीकोण निर्माण व्हावा तसेच उत्तम तपासकार्य करणा-या पोलिसांच्या कार्याची दखल म्हणून केंद्रीय गृहमंत्रालयाने गेल्यावर्षी पासून उत्कृष्ट  तपासकार्यासाठी ‘विशेष पोलीस पदक’ पुरस्कार सुरु केला आहे. यावर्षी  उत्कृष्ट तपासकार्यासाठी  देशभरातील 96 पोलीस अधिकारी- कर्मचा-यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. महाराष्ट्रातील 11 पोलीस अधिकारी-कर्मचा-यांसह अन्य राज्य व केंद्रशासीत प्रदेशांचे पोलीस अधिकारी-कर्मचारी तसेच राष्ट्रीय तपास संस्था(एनआयए), केंद्रीय अन्वेशन ब्युरो (सीबीआय) आणि  अमंलीपदार्थ नियंत्रण विभाग (एनसीबी)च्या अधिकारी कर्मचा-यांचा यात समावेश आहे.
महाराष्ट्र पोलीस विभागाने केलेल्या उत्कृष्ट तपासकार्याची दखल घेवून राज्यातील 11 पोलीस अधिका-यांना विशेष पोलीस पदक जाहीर झाले आहे. यात, पोलीस उपअधिक्षक प्रशांत अमृतकर,   पोलीस निरीक्षक सर्वश्री अविनाश आघाव, सुरेश रोकडे, प्रदीप भानुशाली, हेमंत पाटील, सागर शिवलकर,संजय निकुंबे,सुधाकर देशमुख आणि सहायक पोलीस निरीक्षक सचिन माने यांच्यासह  श्रध्दा वायदांडे आणि  प्रियंका शेळके या महिला सहायक पोलीस निरीक्षकांचाही समावेश आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...