Friday, 2 August 2019

गोंदिया येथे महसूल दिन उत्साहात साजरा

गोंदिया,दि.02- स्थानिक तहसील कार्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये काल गुरुवारी(दि.01) महसुलदिनाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर यांचे हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी उपजिल्हा अधिकारी निवडणुक सुभाष चौधरी हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार राजेश भांडारकर, अप्पर तहसीलदार अनिल खडतकर, गणपत शिंगाडे,  जी.एच मेश्राम,आर. एन पालांदूरकर, नायब तहसीलदार गीता सरोदे आदी मान्यवर उपस्थित होते.
 यावेळी आरोग्य शिबिराचे आयोजन ही करण्यात आले होते. या शिबिराचा 66 कर्मचारी-अधिकारी यांनी लाभ घेतला. दरम्यान सेवानिवृत्त अव्वल कारकुन सुनीता खंडारे यांचा श्री वालस्कर यांचे हस्ते सत्का
र करण्यात आला. यावेळी श्री वालस्कर यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. सन 2017-18 या वर्षात उत्कृष्ठ सेवा बजावणाऱ्या महसूल कर्मचाऱ्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अव्वल कारकून आशिष रामटेके यांनी केले. यावेळी मंडळ अधिकारी, तलाठी आणि कार्यालयातील सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...