मुंबई,दि.17 - महाराष्ट्रातील 5 कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम म्हणजे शुद्ध नौटंकी आहे. या वृक्ष लागवडीच्या माध्यमातून फार मोठ्या भ्रष्टाचाराला खतपाणी घातले जात आहे, असा आरोप अभिनेता सयाजी शिंदे यांनी व्यक्त केला आहे.
वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या 33 कोटी वृक्ष लागवडीवर टीका करत सयाजी शिंदे म्हणाले की, मोजक्याच ग्रामपंचायती झाडे लावण्याचा उपक्रम करतात. 3 हजार 300 झाडे किती ग्रामपंचायतीने लावलेत? 33 कोटी वृक्ष लावल्यावर जपणार कुठे? पाणी आणणार कुठून? दरवर्षी लावलेल्या झाडांचे, त्याला जगविण्यासाठी आलेल्या खर्चाचा हिशोब द्यावा ,अशी मागणी त्यांनी राज्य सरकारला केली.
तसेच वृक्षांमध्ये 250 जाती आहेत. नगरपालिका शाळांच्या प्रत्येक अंगणात गुलमोहर, उंच झाडे दिसतील. दरवर्षी त्याच खड्ड्यात जाऊन झाडं लावली जातात. मंत्र्यांना, अधिकाऱ्यांना वृक्षांच्या जातीची माहिती नाही. कोणतं झाड लावलं पाहिजे याची माहिती नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील वृक्ष लागवड हे केवळ नाटक आहे. असा संताप अभिनेता सयाजी शिंदे यांनी व्यक्त केला.
या वृक्ष लागवडीबाबत सयाजी शिंदे यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि वनखात्याला अनेक प्रश्न विचारले आहेत.
1) शासनाच्या नर्सरीमध्ये सगळ्या जाती का उपलब्ध नाहीत
2) शासन दुसऱ्या राज्याचा आदर्श का घेत नाही. उदा. कर्नाटकातील नर्सरी अनेक जाती उपलब्ध होतात.
3) सगळे अधिकारी आहे त्यांच्याकडून माहिती घ्या
4) लोकांकडून पैसे घेऊन वृक्ष लागवड होत असेल तर त्या सर्व करदात्यांचा पैशाचा हिसोब द्यावा
No comments:
Post a Comment