चंद्रपूर,दि.29 : केंद्र व राज्यातील सत्ताधारी असलेल्या भारतीय जनता पक्षाकडून बहुजन समाजातील विरोधकांवर दडपशाहीचा वापर केल्या जात असल्याच्या निषेधार्थ दि.२८ ऑगस्टला पुकारण्यात आलेल्या सर्वपक्षीय बंदला चंद्रपुरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. बंदचे आवाहन करण्यासाठी सकाळीच रस्त्यावर उतरलेल्या अनेक सामाजिक कार्यकर्ते व राजकीय पक्षांच्या नेत्यांना पोलिसांनी अटक करून दुपारपर्यंत रामनगर व शहर पोलिस ठाण्यात बसवून ठेवित पोलिस बंदोबस्तात बाजारपेठ सुरू ठेवण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. पोलिसांच्या या हस्तेक्षपेमुळे चंद्रपुरातील अनेक सामाजिक संघटनांमध्ये रोष व्यक्त करण्यात येत आहे. लोकशाही मार्गाने सरकारी दडपशाहीचा निषेध करण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनात पोलिस व जिल्हा प्रशासनाकडून बळाचा वापर करण्यात आला, हे विशेष.
या बंदला अनेक व्यवसायिकांनी पाठिंबा दाखवित प्रतिष्ठाने बंद ठेवली तर काहींनी एका विशिष्ट व्यक्तीला पाठिंबा देण्यासाठी बंद असल्याचे गृहित धरुन काही धनाढ्य व्यापाऱ्यांनी विशेष प्रतिसाद दिला नाही.जेव्हा की हा बंद एका व्यक्तीसाठी नसून ओबीसींची विचारधारा दाबणार्या सरकारच्या विरोधात असताना सरकारच्या दबावात काही स्वतःला ओबीसीचे कर्तेधर्ते समजणारेही या बंदमध्ये सहभागी झाले नसल्याचे दिसून आले. भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, आम आदमी पार्टी, बी.आर.एस पी, संभाजी ब्रिगेड, वंचित बुहुजन आघाडी, मनसे, बानाई चंद्रपूर, धनोजे कुणबी समाज संघटना, अखील भारतीय कुणबी संघटना, जनसुराज्य सेना, वैदर्भ तैली संघटन, विदर्भ राज्य आंदोलन समिती, तेलगु समाज संघटन, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ, शिक्षकत्तेर कर्मचारी संघटना, सेल्फ रिस्पेक्ट मुव्हमेंट, ओबीसी फेडरेशन, तिरंगा वाहनी आदी संघटनातील पदाधिकाऱ्यांनी हा बंद पुकारला होता. या पदाधिकाºयांनी सकाळी शहरात फिरून दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले. काही व्यापाºयांनी दुकाने बंद ठेवली. यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त होता.
सेल्फ रिस्पेक्ट मुव्हमेंटचे संस्थापक बळीराज धोटे यांनी भाजपा नेत्यांवर सोशल मिडीयातून केलेल्या आक्षेपार्ह टिकेनंतर त्यांना पहाटेच पोलिसांनी केलेली अटक व त्यानंतर भाजपाच्या महिला आघाडीतर्पेâ धोटे यांचा पुतळा जाळून निषेधाचे आंदोलन करण्यात आले होते मात्र धोटे यांच्यावर झालेली कारवाई ही राजकीय सुडबुध््दीतून झाली असल्याचा आरोप करीत चंद्रपुरातील जवळपास ३५ विविध सामाजिक संघटना व राजकीय पक्षांनी पोलिसांच्या व सरकारच्या दडपशाही कारवाईचा निषेध करीत चंद्रपूर बंदचे आवाहन केले. यासंदर्भात मातोश्री विद्यालयात सर्व संघटनांच्या प्रतिनिधींनी बैठक घेऊन बंदचे आवाहन केले होते.२८ ऑगस्टला सकाळीच चंद्रपुरातील जटपुरा गेट, गिरणार चौक, गांधी चौक व बाजारपेठ असलेल्या परिसरातील महत्वाच्या ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला. दंगानियंत्रक पथकही जटपुरा गेट येथे सकाळी ७.३० वाजतापासून तैनात करण्यात आले. शहरात आंदोलनकत्र्यांनी बंदचे आवाहन करण्यासाठी रस्त्यावर उतरताच पोलिसांनी ठिकठिकाणाहून अनेकांना ताब्यात घेणे सुरू केले. काँग्रेसचे चंद्रपूर शहर अध्यक्ष नंदू नागरकर व त्यांच्या कार्यकर्त्यांना जटपुरा गेट येथून पोलिसांनी अटक केली. राजु झोडे, विनोद थेरे, चंद्रकांत वैद्य, गजानन नागपुरे, किशन नागरकर, बापू धोटे, हिराचंद बोरकुटे, किशोर ढुंमणे, दिलीप झाडे, अजय खांडेकर,अँड फरहत बेग,सुर्या अडबाले,सुनिल भोयर ,प्रा.नाहिद हुसैन ,सुनील मुसळे, मुकेश वरारकर,संजय पारखी आदींसह अनेक कार्यकत्र्यांना अटक करून शहर पोलिस ठाण्यात दुपारपर्यंत ठेवण्यात आले व नंतर सुटका करण्यात आली. अनेक समाजिक कार्यकत्र्यांना पोलिसांनी जेरबंद करीत बंद केलेले दुकाने सुरु करण्यास पोलिस पुढाकार घेत होते. विविध राजकीय पक्ष व विविध सामाजीक संघटनाने पोलीसांचा दडपशाहीचा यावेळी निषेध केला.जटपुरा गेटजवळ घोषणाबाजी करण्यात आली.
No comments:
Post a Comment