Monday 26 August 2019

ओबीसी चळवळीचे प्रखर वक्ते बळीराज धोटेंना अटक,सरकार करतेय सत्तेच दुरुपयोग



आरएसएस व भाजप मिडिया सेल संयोजक राहुल लांजेवारच्या माध्यमातून केली तक्रार


चंद्रपूर(विशेष प्रतिनिधी)दि.25 :-चंद्रपूर जिल्ह्यात ओबीसी समाजाला त्यांचे सामाजिक सविंधानिक हक्क अधिकार मिळावे यासाठी गेल्या दोन दशकाहूनही अधिक काळापासून काम करणारे ‘सेल्फ रिस्पेक्ट मूव्हमेंट’ संघटनेचे अध्यक्ष  व ओबीसीचे प्रखर वक्ते बळीराज धोटे यांच्याविरुध्द आरएसएस व भाजप मिडिया सेलचा सयोंजक राहुल लांजेवारने सोशल मिडियावर भगतसिंह यांच्यावर चालविण्यात आलेल्या न्यायालयीन खटल्याबाबत आक्षेपार्य टिप्पणी केल्याप्रकरणातील तक्रारीच्या आधारे पोलिसांनी दंडुकेशाहीचा वापर करीत धोटे यांना त्यांच्या राहत्या घरातून पहाटे 4 वाजता अटक केली.विशेष म्हणजे सध्याचे सरकार हे ओबीसी चळवळीतील कार्यकर्त्यांना पोलिसी खाक्या दाखविण्यासाठी काम करीत असून हे काम सरकार ओबीसी असलेल्या त्यांच्या पक्षातील कार्यकर्ते व मंत्र्याच्या माध्यमातूनच करीत आहे.धोटे यांना पहाटे अटक करण्यासाठी पोलिसांनी जाण्याएवढा काही गुन्हा झालेला नसतांना पहाटे अटक करायला जाणे म्हणजे विचारधारेवर काम करणार्या कार्यकर्त्यांची मुस्कटदाबी असल्याचा सुर संपुर्ण महाराष्ट्रातून उमटला आहे.चंद्रपूर पोलिसांनी आरएसएस व भाजपच्या दबावात गोंदिया,गडचिरोलीतील कार्यकर्त्यांनंतर आता चंद्रपूरात धोटे यांना केलेल्या अटकेचा निषेध सर्वच स्तरातून नोंदविण्यात येत आहे.
बळीराज धोटे यांनी 20 -25 वर्षापुर्वी RSS आणि भाजपमधे काम केल्यानंतर या दोन्ही संघटनेत ओबीसींचा वापर करुन फक्त सत्ता हस्तगत करुन ओबीसी व इतर समाजात भांडण लावण्याचे काम होत असल्याचे लक्षात येताच त्यांनी हे दोन्ही संघटन सोडून दिले.तेव्हापासून चंद्रपूर जिल्ह्यात ओबीसी आंदोलनाची सुरवातच धोटे यांनी केली आणि आजही ते करीत आहेत.धोटे यांच्यावर समाजजागृतीदरम्यान चंद्रपूर, सावली, मुल आणि ढाबा पोलीस स्टेशन येथे RSS आणि पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विरोधात टिका केल्याप्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यांनी तक्रारी दिल्या.चंद्रपूर शहर पोलीस स्टेशन येथे भारतीय दंड संहिता 1860 कलम 505/2 अन्वये राहुल लांजेवार या RSS आणि भाजप मिडीया सेल चे संयोजक असलेल्या कार्यकर्त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.त्या तक्रारीच्या अनुषंगाने आधी चौकशी करायला हवी होती मात्र सत्तेच्या दबावात पोलिसांनी पहाटे चार वाजता बळिराज धोटे यांच्या घरी जाऊन त्यांना ताब्यात घेतले.कुठल्याही सामान्य व्यक्तीलाही पोलिसांना अशापध्दतीने अटक करण्याचे अधिकार नाहीत.कुठल्याही सभ्य व्यक्तीला अशाप्रकारे पोलीस कशी काय अटक करू शकते? असा प्रश्न बळीराज धोटे यांना पडल्यामुळे त्यांनी खाकी वर्दीत नसलेल्या पोलिसांना विचारले की माझी काय चूक आहे ? त्यावर पोलिसांनी फेसबुक वरील आक्षेपार्ह पोस्टबद्द्दल तुमच्या विरोधात तक्रार असल्याचे सांगितले आणि त्यांना अटक केली.या सोबतच सावली आणि इतर ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांनी तक्रारी दिल्याची माहिती समोर आली आहे.चंद्रपूर शहर पोलीस स्टेशन मधे रात्रीच्या 1 वाजून 45 मिनिटानी गुन्हा नोंद झाल्याची माहिती असतांना अनेक वृत्तपत्रात गुन्हा नोंद होऊन अटक झाल्याचे वृत्त अगोदरच कशा प्रकाशित झाल्या ?  बळीराज धोटे यांच्यावर गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक होणार असा साक्षात्कार पत्रकारांना झाला कसा ? असे अनेक प्रश्न निर्माण झाले असून हा सर्व विषय कुठे तरी सत्तेचा गैरफायदा घेण्याचा दिसून येत आहे.
बळीराज धोटे यांना अटक झाल्याचे वृत्त कळताच ओबीसी चळवळीतील त्यांचे समर्थक कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी पोलीस ठाण्यात केली. त्यावेळी तिथे असलेल्या काही पत्रकारांनी धोटे यांना झालेल्या अटकेबाबत विचारले असता पोलिसांनी  धोटे यांना बोलण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करीत मानवाधिकाराचे हनन करण्याचा प्रयत्न केला.त्यातच कार्यकर्त्यांचा रोष बघून शेवटी पोलिसांनी धोटे यांना बोलू दिले असतान आपल्याला पहाटे चार वाजता पोलिसांनी कसे घरी येऊन कशापध्दतीने अटक केली,याबद्दल आपबीती सांगितली.एक उपपोलीस निरीक्षक यांनी त्यांच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना फोन करून परिस्थिती सांगितली आणि लगेच फोनवरील आदेशान्वये आपणास पोलिसांनी अक्षरशः ओढाताण करून प्रतिक्रिया देण्यास मनाई केली आणि त्यांना अमानुषपणे ओढत नेले.पोलीस हे कायद्याचे सरंक्षक राहिले नसून आत्या कायदाच वेशीवर टांगू लागल्याने लोकशाहीची हत्या करीत असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया कार्यकर्त्यांनी व्यक्त करीत सरकारच्या कृत्याचा निषेध नोंदविला.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...