Thursday, 1 August 2019

व्याघ्र प्रकल्प संरक्षण व संवर्धनात नवेगाव-नागझिरा राज्ङ्मात प्रथम




गोंदिया(खेमेंद्र कटरे),दि.०१ : व्याघ्र प्रकल्पाचे संरक्षण आणि संवर्धन, नियोजन विकासात राज्यामध्ये नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाने मुल्याकंंन रेटींगमध्ये ७८.९१ टक्के गुण घेत प्रथमक्रमांक पटकावला आहे.तर देशामध्ये १२ वा क्रमांका पटकावला. उत्तराखंड राज्यातील सर्वात जुन्या असलेल्या जिम कारबेट व्याघ्र प्रकल्पासोबत देशात संयुक्तरित्या ७८.९१ टक्के रेqटग मिळवित अल्पावधीतच नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या चमने यशस्वी कामगिरी इतर व्याघ्र प्रकल्पाच्या तुलनेत केल्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जाहिर झालेल्या चौथ्या अखिल भारतीय व्याघ्र गणना व्यवस्थापन ,परिणामकारकता मुल्याकंन अहवालातून समोर आले आहे.
वाघांची संख्या,अधिवास वाचविणे व वाढविण्याकरीता १९७३ मध्ये प्रोजेक्ट टायगर हा प्रकल्प सुरु करण्यात आला होता.त्यावेळी ९ व्याघ्रप्रकल्प होते आज मात्र त्यांची संख्या देशात ५० च्या वर असून महाराष्ट्रात ६ एवढी आहे.२०१३ मध्ये देशातील ४६ वा व महाराष्ट्रातील ५ वा व्याघ्र प्रकल्प म्हणून नवेगाव नागझिरा व्याघ्रप्रकल्पाचा समावेश करण्यात आला.तेव्हापासून या व्याघ्रप्रकल्पाची धुरा ज्यांनी ज्यांनी सांभाळली त्या सर्वांनी नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाला देशपातळीवर नाव मिळावे यासाठी सकारात्मक भूमिका ठेवत लोकसहभागाच्या माधम्यातून केलेल्या कार्यामुळेच महाराष्ट्रातील ६ व्याघ्र प्रकल्पामध्ये एनएनटीआरला पहिला क्रमांक मुल्याकंनात मिळविता आलेला आहे.
या सर्व व्याघ्र प्रकल्पाच्या व्यवस्थापनचा दर्जा व परिणामकारकतेचे केंद्रसरकारच्यावतीने दर ४ वर्षातून एकदा मुल्यांकन केले जाते.या मुल्यांकनात व्याघ्र प्रकल्पाशी निगडीत ३२ विषयांचा क्षेत्रीय भेटी देऊन तसेच व्याघ्रप्रकल्पाचे कर्मचारी व सहभागीदार यांच्याशी चर्चा करुन आणि कार्यालयातील दस्तावेजाची तपासणी करीत केंद्रसरकारच्या समितीकडून मुल्यांकन केले जाते.यामध्ये वन्यजीव व्यवस्थापनाची कामे,अधिवास विकासाची कामे,वन्यजीव सरंक्षणाची कामे व सुविधा लोकसहभागासाठी ग्रामपरिस्थितीकीय विकासाची कामे,निसर्गपर्यटन,जनजागृती सहभागीदार यांचा व्यवस्थापनातील सहभाग,संसोधन,अनुदानाची उपलब्धता व वापर,वन्यजीव विविधता व विपुलता अशा ३२ विषयांचे मुल्यांकन करुन व्याघ्र प्रकल्पाचे स्थान निश्चित केले जाते.
सदर या व्यवस्थापन परिणामकारकता मुल्याकंनात(एमईई) महाराष्ट्रातील ६ व्याघ्रप्रकल्पापैकी नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाने ७८.९१ टक्के रेqटग मिळवित राज्यात प्रथम क्रमांक पटकावला.तर देशातील ५० व्याघ्रप्रकल्पात १२ व्या क्रमांकावर आलेला आहे. विशेष म्हणजे १३ व्याघ्र प्रकल्पाच्या क्लस्टर १ मध्ये जिमकार्बेट व्याघ्र प्रकल्प हा सर्वात जुना प्रसिध्द व्याघ्र प्रकल्प देशात पहिल्या क्रमांकावर आलेला आहे.तर महाराष्ट्रातील मेळघाट,ताडोबा,पेंचसह मुदुमलाई,सुंदरबन,बांधवगड,रणथबोंर आदी प्रसिध्द जुन्या व्याघ्र प्रकल्पाच्यापुढे नागझिरा नवेगाव व्याघ्र प्रकल्प मुल्यांकनात राहिलेला आहे.
देशभरातील वनक्षेत्रात राष्ट्रीय व्याघ्र गणना वर्ष २०१८ नुसार २९७७ वाघांचा अधिवास आहे. २०१४ मध्ये ही संख्या १४०० ऐवढी होती. यात महाराष्ट्रात वर्ष २०१४ च्या गणनेनुसार १९० वाघांची संख्या होती. ही संख्या वाढून ३१२ वर पोहोचल्याचा अंदाज आहे. देशात मध्यप्रदेशात सर्वाधिक ५२६ वाघ आहेत. तर कर्नाटकात ५२४, उत्ताखंडात ४२२ व महाराष्ट्रात ३१२ वाघांची नोंद झाली असून महाराष्ट्र देशात चौथ्या क्रमांकावर आहे. गेल्या चार वर्षात राज्यात ६५ टक्क्याने वाघांची संख्या वाढली आहे. राज्यातील ३१२ वाघांपैकी २८० वाघ हे विदर्भातील आहेत. यामध्ये सर्वाधिक वाघ ताडोबा अभयारण्यात असून नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात ६ वाघांची नोंद आहे.
राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाने राज्यातील आकडे जाहीर केले. परंतु प्रत्येक राज्यातील व्याघ्र प्रकल्प निहाय व क्षेत्रनिहाय वाघांच्या संख्येचा अहवाल जारी केला नाही. विदर्भात ताडोबा, मेळघाट, पेंच, बोर व्याघ्र प्रकल्पासह नवेगाव, नागझिरा, उमरेड-कèहांडला, कोका अभयारण्य आणि नागपूर जिल्ह्याला लागून असलेले वनक्षेत्र आहे. अशास्थितीत विदर्भातील जंगलातच वाघांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. विदर्भात वाघांच्या प्रजननात ९० ते ९५ टक्के वाढ होऊन वाघांची संख्या २९५ झाल्याचा अंदाज आहे. सूत्रानुसार वर्ष २०१४ च्या व्याघ्र गणनेनंतर महाराष्ट्रात १९० ते १९५ वाघांची संख्या असल्याचा अंदाज लावण्यात आला होता. त्याचे विश्लेषण केल्यानंतर विदर्भात वाघांची संख्या १८० नोंदविण्यात आली होती. महाराष्ट्राच्या दुसèया भागात वाघांचे क्षेत्र असलेल्या यावल (खान्देश) आणि सह्याद्री टायगर रिझव्र्ह(पश्चिम महाराष्ट्र)मध्ये एकूण वाघांची संख्या ५ टक्के म्हणजे १० ते १५ वाघ असल्याचे नमूद करण्यात आले होते. यावर्षी २०१८ च्या गणनेनुसार राज्यात वाघांची संख्या ३१२ असल्याचा आकडा जारी करण्यात आला आहे. मागील व्याघ्र गणनेचा अहवाल घोषित झाल्यानंतर सहा महिन्यांनी ‘एनटीसीएङ्कङ्क ने वाघांच्या संख्येचे आकडे जारी केले होते. परंतु यावेळी एनटीसीएच्या सूत्रानुसार विभागनिहाय अहवाल तयार करण्यासाठी एक महिन्याचा कालावधी लागू शकतो.
सर्वांच्या सहकार्यानेच झाले शक्य
नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाने प्रकल्पाच्या व्यवस्थापनचा दर्जा व परिणामकारकतेसोबतच संरक्षण व संवर्धन कार्यात केलेल्या उल्लेखनिय कार्यामुळेच राज्यातील जुन्या व्याघ्र प्रकल्पांच्या तुलनेत अल्पावधीत घेतलेली ही आघाडी प्रकल्प व्यवस्थापनातील सर्व अधिकारी,कर्मचारी आणि व्याघ्र प्रकल्पालगत असलेल्या गावातील व्यवस्थापन समित्यांसह नागरिकांच्या सहकार्यामुळेच होऊ शकल्याची प्रतिक्रिया नवेगाव नागझिरा व्याघ्रप्रकल्पाचे प्रकल्प संचालक आर.एम.रामानुजम यांनी बेरार टाईम्सकडे व्यक्त केली.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या अहवालाचे प्रकाशन होऊन वाचन करण्यात आले त्यावेळी आपल्या नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाने मुल्याकंनात देशात १२ व राज्यात प्रथम क्रमांक पटकावल्याचे एैकून आनंद झाला असून हा या जिल्ह्यातील सर्व नागरिकांचा सन्मान असल्याचे म्हणाले.या कार्यात नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील सहायक वनसंरक्षक प्रदीप पाटील,सदगीर,श्रीकांत पवार,सहाय्यक उपनवसंरक्षक उत्तम सावंत ,श्री पाठक यांच्यासह अनेकांचे सहकार्य लाभल्याचे त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...