Saturday 3 August 2019

महाराष्ट्र-छत्तीसगडच्या सीमेवर चकमक; सात नक्षली ठार

गोंदिया,दि.03:छत्तीसगडच्या राजनांदगांवात शनिवारी डीआरजीचे जवान आणि नक्षलवद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत 7 नक्षलवाद्यांनी कंठस्नान घालण्यात जवानांना यश आले. 
या घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. सध्या या ठिकाणी शोधमोहीम सुरु असल्याचे छत्तीसगडचे पोलिस महासंचालक डी.एम अवस्थी यांनी ही माहिती दिली.महाराष्ट्राच्या सीमेजवळील बोरतलाव ते सीतागोटा(काळी पहाडी)च्या दरम्यान शेरपार आणि सीतागोटा डोंगरांवर ही कारवाई करण्यात आली. तिथे नक्षलवदी लपून बसल्याची माहिती मिळाली होती. डीआरजी जवान शनिवारी सकाळी 8 वाजता वाघनदी भागात शोधमोहीमेसाठी निघाले,त्या दरम्यान नक्षल व पोलिसात चकमक झाली.या मोहिमेत डीआरजीसोबत छत्तीसगड आर्म्स फोर्स (सीएएफ) आणि जिल्हा पोलिस दल सहभागी झाले होते.ठार झालेल्या नक्षल्यामध्ये तीन महिला नक्षल्यांचाही समावेश आहे.या चकमकीत तीन पोलिस जवान जखमी झाले आहेत.
नक्षलवादी हल्ला घडवल्यानंतर गोंदिया जिल्ह्यातील नक्षल भागाला आपला ‘रेस्ट झोन’ म्हणून वापर करतात. नक्षली ठार झालेला परिसर हा गोंदिया जिल्ह्यातील बिजेपार पोलिस चौकीला लागून असलेला भाग असून आमच्याकडूनही नक्षल्याविरुध्द कोंबिंग आपरेशन राबविण्यात आले, परंतु मारले गेलेले नक्षलवादी हे छत्तीसगड सीमेत राजनादंगाव पोलिसांनी मारल्याची माहिती बेरार टाईम्ससोबत बोलताना गोंदियाचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिली.
‘ पीपल्स लिबरेशन गुरिल्ला आर्मी’ व जनवादी क्रांतीकारी माओवादी संघटनेच्या वतीने नक्षल नेता चारु मुजूमदार यांच्या स्मरर्णाथ २८ जुलै ते ३ ऑगस्टपर्यंत शहीद नक्षल सप्ताह पाळला जातो. या सप्ताहा दरम्यान नक्षलवाद्यांकडून मोठ्या घातपाताच्या घटना घडविल्या जातात. त्यामुळे सुरक्षा दलांकडून परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवला जातो. दरम्यान छत्तीसगड राज्यातील  वाघनदी पोलिस ठाणेंतर्गत येत असलेल्या भागातून नक्षली जात असल्याची माहिती छत्तीसगड पोलिसांना मिळताच जिल्हा पोलिस व सीएएफची पार्टीने कोंबिंग ऑपरेशन सुुरू केले. त्यातच गोंदिया जिल्ह्यातील बिजेपारभागाकडूनही कोंबिंग राबविण्यात आले. या घडामोडीत नक्षली व पोलिसांदरम्यान झालेल्या गोळीबारात 7 नक्षली ठार झाले. सातही नक्षल्यांचे मृतदेह वाघनदी पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याचसोबत ए.के. ४७, ३०३ रायफल, १२ बोर बंदुका व अन्य नक्षल सामग्री ताब्यात घेतली.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...