साकोली,दि.18ः- तालुक्यातील लाखांदूरकडे जाणार्या कुंभली/धर्मापुरी गावाजवळील चुलबंद नदीवरील पुलावरुन काळीपिवळी वाहन उलटल्याने अवैध प्रवासी वाहतुकीला आळा घालण्यास प्रशासन अपयशी ठरल्याने आज दुपारी वडापाच्या ट्रॅक्सला झालेल्या अपघातात पाच तरुणींसह एक महिला ठार झाली आहे. तर सहा जण जखमी आहेत. महिलांची ओळख पटविणे सुरु असून जखमींना साकोलीच्या उपजिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले आहे.
मृतामध्ये गुणगुण हितेश पालांदुरकर(गोंदिया),शितल सुरेश राऊत(सानगडी),अश्विनी सुरेश राऊत(सानगडी),शिल्पा श्रीरंग कावळे(सासरा),सुरेखा देवाजी कुंभरे(सासराटोली) तर सौ.शारदा गजानन गोटेफोडे(रा.सासरा)यांचा समावेश आहे.जखमीमध्ये सौ.वंदना अभिमन सतीमेश्राम(सासरा),कु.डिपंल कावळे(सासरा),शुभम नदंलाल पातोडे(तई) यांना भंडारा येथे हलविण्यात आले आहे.तर साकोली उपजिल्हा रुग्णालयात सौ.विना हितेशराव पालांदूरकर(गोंदिया),कु.सिध्दी हितेशराव पालांदूरक(गोंदिया),मालन तुळशीराम टेंभुर्णे(खोलमारा) व अभिमन तातोबा सतीमेश्राम (सासरा )यांच्यावर उपचार सुरु आहेत.
No comments:
Post a Comment