Friday, 21 June 2019

नागपूरच्या युवकाचा शिलापूर नाल्यात बुडून मृत्यू

देवरी,दि.21- देवरी येथे नागपूरहून शिक्षणासाठी आलेल्या एका 19 वर्षीय युवकाचा नजिकच्या शिलापूर नाल्यावर आपल्या मित्रांसोबत आंघोळीला गेले असता पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी 9 ते 10 वाजेच्या दरम्यान घडली. या प्रकरणी देवरी पोलिसांत मर्ग दाखल झाला असून पुढील तपास सुरू आहे.
मृताचे नाव धृव अशोकराव उजवनकर (वय19), राहणार संजय नगर, हसनबाग नागपूर असे आहे.
पोलिसांनी  दिलेल्या माहितीनुसार, मृत युवक हा नागपूरच्या हसनबाग परिसरातील रहिवासी असून तो शिक्षणासाठी आपल्या मावशीकडे देवरी येथे मुक्कामी होता. धृव हा स्थानिक मनोहरभाई पटेल विज्ञान महाविद्यालयातील विज्ञान शाखेचा विद्यार्थी होता. आज सकाळी मृतक धृव हा आपल्या काही मित्रांसोबत नजिकच्या शिलापूर येथील नाल्यावर आंघोळीसाठी गेला होता. यावेळी त्याचा तोल गेल्याने तो पाण्यात बडून मृत पावला. या प्रकरणी फिर्यादी भोजराज उद्धवराव हूड (वय 52) राहणार देवरी यांचे तक्रारी वरून देवरी पोलिसांनी मर्ग दाखल करून चौकशी सुरू केली आहे

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...