राजकुमार बडोले, प्रकाश मेहता यांचे राजीनामे
राजकुमार बडोले, प्रकाश मेहता, विष्णू सावरा, दिलीप कांबळे, प्रवीण पोटे, अंबरिष अत्राम यांनी त्यांच्या मंत्रीपदाचे राजीनामे मुख्यमंत्र्यांना सादर केले असून मुख्यमंत्र्यांनी त्यांचे राजीनामे स्विकारले आहेत.
मुंबई,दि.16 : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार सुरु झाला असून पहिल्या शपथविधीचा मान राधाकृष्ण विखे पाटलांना देण्यात आला आहे. तर शिवसेनेच्या जयदत्त क्षीरसागर यांना दुसरा मान देण्यात आला. तर तिसरा स्थान भाजप मुबंई शहर अध्यक्ष आशिष शेलार यांना देण्यात आला. तिकडे भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आज झाला. या फेरबदलात आठ मंत्र्यांना घरचा रस्ता दाखवण्यात येणार आहे. विस्तारानंतर लगेच कॅबिनेटची बैठक घेऊन खातेवाटप जाहिर होणार आहे.भंडारा-गोंदिया जिल्हाचे विधानपरिषद सदस्य डाॅ.परिणय रमेश फुके यांनी राज्यमंत्री पदाची शपथ घेतली.पहिल्यांदाच विधानपरिषदेत 3 वर्षापुर्वी निवडून गेले ते मुख्यमंत्र्याचे खास असल्याने त्यांना संधी मिळाली.विखेंनी काँग्रेसच्या सर्व पदाचा व आमदारकीचा राजीनामा दिलेला आहे. सध्या ते विधीमंडळाच्या कोणत्याही सभागृहाचे सदस्य नाहीत.
फडणवीस सरकारचा बहुचर्चित मंत्रिमंडळ विस्तार अखेर रविवारी सकाळी ११ वाजता राजभवनात पार पडला. यात भाजपच्या १० तर शिवसेनेच्या दोन नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. आठवले गटाच्या अविनाथ महातेकर यांच्यासह एकून १३ जणांचा आज शपथविधी झाला. मात्र, यात आयात नेते विखे आणि क्षीरसागर यांना शपथ घेण्याची सर्वप्रथम संधी देण्यात आली. हे दोन्हीही नेते ज्येष्ठ व बडे असले तरी आयात नेत्यांना मंत्रिपद देण्याबाबत भाजप-शिवसेनेतर्गंत धुसफूस सुरू होती.
बुलडाण्याचे डाॅ.संजय कुटे यांनीही शपथ घेतली.सुरेश खाडे,डाॅ.अनिल बोंडे यानीही शपथ घेतली.विखेपाटील शपथ घेताना कोणीही टाळ्या किंवा घोषणा दिल्या नाहीत. मात्र, शिवसेनेचे क्षीरसागर यांनी शपथ घेताना आवाज कुणाचा शिवसेनेचा अशा घोषणा देण्यात आल्या. यानंतर शेलार, खाडे व बोंडेच्या वेळीही आवाज कुणाचा भारतीय जनता पार्टीचा व भाजपा जिंदाबादचे नारे देण्यात आले. कुटे यांच्यावेळी गजानन महाराजांच्या घोषणा देण्यात आल्या.तानाजी सावंत यांच्यावेळी जय शिवाजी जय भवानीच्या घोषणा निणादंल्या.भाजपचे अशोक उईके यांनी कॅबिनेटची,योगेश सागर यांनी राज्य मंत्रीपदाची शपथ घेतली.दलित पँंथरचे संस्थापक सदस्य आरपीआय नेते अविनाश महातेकर यांनाही राज्य मंत्रीपदाची शपथ देण्यात आली.मावळचे आमदार संजय भेगडे यांनीही राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली.फुके यांच्या शपथेच्यावेळीही घोषणाबाजी झाली.
मंत्रिमंडळ विस्तारातील मंत्र्यांचे मतदारसंघ
अतुल सावे मराठवाडा
परिणय फुके विदर्भ
अविनाश महातेकर मुंबई
योगेश सागर। मुंबई
बाळा भेगडे – पुणे पश्चिम महाराष्ट्र राज्यमंत्री
विखे पाटील। उत्तर महाराष्ट्र
तानाजी सावंत। यवतमाळ विदर्भ
संजय कुटे। विदर्भ
आशिष शेलार। मुंबई
अशोक उईके। विदर्भ
अनिल बॉंडे। विदर्भ
जयदत्त क्षीरसागर। मराठवाडा
सुरेश खाडे कॅबिनेट। पश्चिम महाराष्ट्र
No comments:
Post a Comment