देवरी,दि.21- स्थानिक तालुका क्रीडा संकूलाच्या मैदानावर आज शुक्रवारी (दि.21) आयुष विभाग आणि नगर पंचायत प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने जागतिक योग दिवसाचे आयोजन करण्यात आले होते.
या पाचव्या जागतिक योग दिवसाचे आयोजनाचे वेळी देवरीच्या नगराध्यक्ष कौशल कुंभरे, उपनगराध्यक्ष आफताब शेख आणि मुख्याधिकारी राजेंद्र चिखलखुंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. या योग दिवसाचे औचित्यावर पतंजली योग संस्थानच्या योग प्रशिक्षकांनी उपस्थितांना योग विद्येचे धडे योग्यरीत्या गिरविता येण्यासाठी मार्गदर्शन करीत योग करण्याचे मानवी जीवनावर होणारे फायदे सुद्धा विशद केले. या शिबीराला देवरी येथील लोकप्रतिनिधींसह कर्मचारी अधिकारी यांनी हजेरी लावली. स्थानिक नागरिकांनी सुद्धा या शिबीराचा लाभ घेतला.
No comments:
Post a Comment