Monday, 3 June 2019

देवरी येथे निषेध मोर्चा व रॅलीला सुरवात


बाजारपेठेत व्यापाऱ्यांनी पाळला कडकडीत बंद

आरोपीला फासी द्या च्या मागणीने दुमदुमली देवरी नगरी

महिलांनी सुद्धा घेतला उत्स्फुर्त सहभाग

देवरी,दि.03- गेल्या शनिवारी देवरीच्या सुरभी चौकात एका अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करण्याऱ्या भोंदू पत्रकारावर कठोर कार्यवाही आणि त्याला फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी स्थानिक पंचशील चौकातून भव्य रॅली व मोर्च्याला सकाळी साडे नऊवाजता सुरवात झाली आहे. दरम्यान, ठाणेदार कमलेश बच्छाव यांचे नेतृत्वात पोलिसांनी शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख बंदोबस्त लावला आहे.
सविस्तर असे की,  सुरभी चौक येथे राहणारा भोंदू पत्रकार अश्विन विठ्ठल मेश्राम (वय29) याने घराशेजारी पाहुणी म्हणून आलेल्या एका पाच वर्षीय मुलीवर घरी बोलावून अत्याचार केल्याची घटना दि.1 जून रोजी घडली होती. या घटनेमुळे देवऱी शहरात आरोपी विरुद्ध कमालीचा संताप पसरला होता. या घटनेतील आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, ही मागणी समाजाच्या सर्वच स्तरातून उचलून धरण्यात आली. भविष्यात अशा घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी देवरीतील महिला विशेषतः आग्रही आहेत. 
आज सकाळी सर्वच राजकीय आणि समाजिक संघटनांनी या घटनेचा निषेध करण्यासाठी स्थानिक पंचशील चौकातून निघालेल्या रॅलीत आपला सहभाग नोंदविला. यावेळी महिला व युवक-युवती आणि बालकांचा सु्द्धा समावेश होता. ही रॅली पंचशील चौक, मस्कऱ्या चौक, बौद्धविहार, चिचगड रोड. दुर्गा चौक आदीस्थानावरून भ्रमण करीत उपविभागीय अधिकारी कार्यालयावर नियोजित आहे. उल्लेखनीय म्हणजे प्रथमतःच देवरी शहरात व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद ठेवून आरोपीला कडक शिक्षची मागणी केली आहे. 
या मोर्च्याचे उपविभागीय अधिकारी देवरी यांचे कार्यालय परिसरात जाहीर सभेत रुपांतर झाले. प्रशासनाच्या वतीने देवरीचे तहसीलदार विजय बोरुडे यांनी मोर्च्याला सामोर जाऊन मागण्यांचे निवेदन स्विकारले.


No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...