Saturday, 8 June 2019

देवरीची अनुश्री जिल्हयात प्रथम



गोंदिया,दि.०८ः- महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळाच्या वतीने मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या इयत्ता १०वी परिक्षेचा निकाल जाहिर झाला असून गोंदिया जिल्ह्याचा निकाल ६८.४६ टक्के लागला आहे. नागपूर विभागात जिल्ह्याचा निकाल दुसऱ्या क्रमांकावर राहिला असून २१हजार ३३९ परिक्षार्थ्यापैकी  २१ हजार ०५७ परिक्षार्थीनी परीक्षा दिली. तर १४ हजार ४१६ उत्तीर्ण झाले. यामध्ये २६६० विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीत,६७९३ विद्यार्थी प्रथम श्रेणीत,४५४७ द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झालेदेवरी मनोहरभाई पटेल हायस्कूलची अनुश्री हेमंतकुमार भेंडारकर हिने यावर्षी नागपूर बोर्डाने घेतलेल्या 10वीच्या परीक्षेत 95.60 टक्के गुण मिळवून जिल्ह्यात प्रथम येण्याचा मान मिळविला आहे.तर द्वितीय क्रमांकावर अर्जुनी मोरगाव येथील जी.एम.बी.विद्यालयाची विद्यार्थीनी कल्याणी प्रभु सोनवाने हिने 94:60%गुण मिळवुन अर्जुनी मोर तालुक्यात प्रथम तर जिल्ह्यात द्वितीय क्रमांक मिळविला आहे.

जिल्ह्यात सालेकसा तालुक्याचा निकाल सर्वाधिक ७२.२३ टक्के लागला आहे.नंतर तिरोडा तालुका ६९.९६ टक्के, गोंदिया तालुका ६९.७६टक्के,आमगाव तालुका ६९.६४ टक्के,सडक अर्जुनी तालुका ६८.४३ टक्के,गोरेगाव तालुका ६६.१५ टक्के तर देवरी तालुक्याचा निकाल सर्वात कमी ६१.४५ टक्के लागला.मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ७४.१३ टक्के आहे.तर मुलांचे प्रमाण ६२.८४ टक्के आहे.
गोरेगाव तालुक्यातील माडेल कान्वेटचा निकाल ९३.३३ टक्के,किरसान मिशन स्कुल गोरेगाव १०० टक्के,परशुराम विद्यालय मोहगाव बु.६४.०६ टक्के निकाल लागला आहे.प्रथम श्रेणीत २०,द्वितीय श्रेणीत १६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.परिक्षेला बसलेल्या ६४ पैकी ४१ विद्याथ्र्यांनी यश संपादन केले.

देवरी-मनोहरभाई पटेल हायस्कूलचा निकाल 68.18 टक्के लागला असून यामध्ये प्राविण्य श्रेणीत 18 विद्यार्थी, प्रथम श्रेणीत 51, द्वितीय श्रेणीत 55 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यामध्ये अनुश्री भेंडारकर हिने 95.60 टक्के गुणे घेत तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. याशिवाय सानिया राजेश देशपांडे 94.40 टक्के, आदित्य नेपालचंद बावणथडे 91.40 टक्के आणि अंकिता रोशण शहारे 90.20 टक्के गुण मिळवून प्राविण्य श्रेणीत स्थान मिळविले आहे.यशस्वी विद्यार्थ्याचे प्राचार्य के.सी.शहारे, उपमुख्याध्यापक गोंडाणे, एसटी हलमारे आदी शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.

 गोरेगाव तालुक्यात पी.डी.रहागंडाले विद्यालयाची उषा पटले प्रथम

पी.डी.रहागंडाले विद्यालय गोरेगावचा दहाविचा निकाल ७४.२८ टक्के लागला असून १०५ विद्याथ्र्यापैकी ७८ उत्तीर्ण झालेत.त्यातील १७ विद्यार्थी प्राविण्यश्रेणीत तर ४१ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले.विद्यालयातून प्रथम क्रमांक उषा तिलकचंद पटले हिने 456 गुण(91.20%) मिळवित पटकावला.तर  द्वितीय क्रमांक सायली आर बोपचे द्वितिय 448 गुण( 90.20%)व तृतीय क्रमांक गुलशन बी. कटरे ने 447 गुण(90.00),चतुर्थ क्रमांक कार्तीकेय पी डोमळे याने ४३८ गुण घेऊन तर चैतन पी पारधी याने ४३६ गुणे पाचवा क्रमांक विद्यालयातून पटकावला.उत्तीर्ण विद्याथ्र्यांचे संस्था अध्यक्ष डॉ.टी.पी.येळे,सचिव एड.टी.बी.कटरे,संचालक यु.टी.बिसेन,प्राचार्य एच.डी.कावळे,पर्यवेक्षक वाय.आर.चौधरी,सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी केले आहे. तालुक्यातीलच किरसान मिशन स्कुल येथील विद्यार्थी सुजल रवीशंकर अग्रवाल याने 450 गुण मिळवित तालुक्यात द्वितीय क्रमांक पटकावला आहे.
गोरेगाव तालुक्यातील पिंडकेपार येथील विकास हायस्कुलचे 32 विद्यार्थी दहावीच्या परिक्षेला बसले त्यापैकी 18 विद्यार्थी हे नापास झाले.फक्त 14 विद्यार्थी उत्तीर्ण होऊ शकले.शाळेचा निकाल 43.75 टक्के एवढा लागला आहे.
प्रांजली आगाशे  तिरोडा तालुक्यात प्रथम
तिरोडा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने आज (ता.८) दहावीचा निकाल जाहीर  करण्यात आला. या दहावीच्या परिक्षेत शहीद मिश्रा विद्यालयाची विद्यार्थिनी कु. प्रांजली ओंकार आगाशे हिने ९४.४० टक्के गुण प्राप्त करून तालुक्यात प्रथम येण्याचा मान पटकाविला.
विशेष म्हणजे, अंजलीच्या मोठ्या वडिलाची तिन्ही मुली सुद्धा तालुक्यात प्रथम आल्या होत्या. हीच परंपरा प्रांजलीने कायम ठेवली. त्यातील मोठी बहीण एमडीएस तर दोघ्या जुडव्या बहिणी ह्या एमबीबीएस करीत आहेत व प्रांजलीनेही सुद्धा मी पण वैद्यकीय क्षेत्रात वळण्याची ईच्छा व्यक्त केली. प्रांजलीने आपल्या यशाचे श्रेय शिक्षक वृंद व आई-वडिलांना दिले. अंजलीचे वडील झेरॉक्स दुकान चालवितातत तर आई गृहिणी आहे.

आदिवासी विकास हायस्कूल खजरी/डों. चा 83.24 टक्के निकाल
खजरी:जगत कल्याण शिक्षण संस्था साकोली द्वारा संचालित खजरी येथील आदिवासी विकास हायस्कूल येथील इ.10वी चा निकाल 83.24 %.लागलेला आहे. परिक्षेला बसलेल्या 185 परिक्षार्थ्यापैकी
154 उत्तीर्ण झाले असून विशेष प्राविण्य श्रेणीत 53,प्रथम श्रेणी -87,द्वितिय श्रेणी -13 व तृतिय श्रेणीत – 01 विद्यार्थी आला आहे.यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थाध्यक्ष जे.एस.रंहागडाले,
सचिव एन.एन.येडे,प्राचार्य खुशाल कटरे ,उपमुख्याध्यापक बी.आर.देशपांडे,पर्यवेक्षक आर.के.कटरे,सर्व प्राध्यापक,हायस्कूल शिक्षक,मिडल स्कूल शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...