Monday, 1 July 2019

राज्यमंत्री फुके, खा. मेंढे व आ. पुराम यांचे जंगी स्वागत

– शहरातून रैली :  हजारोच्या संख्येने कार्यकर्त्यांची उपस्थिती
गोंदिया,दि.01 जुर्लेः- राज्यमंत्री झाल्यानंतर डॉ. परिणय फुके, खा.सुनील मेंढे व अनुसुचित जमाती कल्याण समितीच्या अध्यक्ष पदावर नियुक्ती झालेले आ. संजय पुराम यांचे गोंदिया येथे प्रथम आगमनावर कार्यकर्त्यांकडून रविवारी ३० जून रोजी जोरदार स्वागत करण्यात आले. तसेच भारतीय जनता पार्टी तर्फे शहरातून रैली काढण्यात आली. यावेळी मोठ्यासंख्येत नागरिकांनी व अनेक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.
रविवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास  विदर्भ एक्सप्रेस ने राज्यमंत्री डॉ. फुके व खा. मेंढे यांचे गोंदिया रेल्वेस्थानकावर आगमन झाल्यावर उपस्थित कार्यकर्त्यांनी ढोल, ताशाच्या गजरात त्यांचे जोरदार स्वागत केले. यावेळी रेल्वे स्थानक परिसरातून रैली काढण्यात आली. सदर रैली दुर्गा चौक गोरेलाल चौक होत गांधी प्रतिमा येथे आल्यावर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेवर पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यानंतर जयस्तंभ चौक मार्गे आंबेडकर चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन करण्यात आले. रैली चे समापन पवार बोर्डिंग येथे आयोजित भाजपा जिल्हा बैठकीत करण्यात आले. रॅलीत प्रामुख्याने जिल्हाध्यक्ष हेमंत पटले,आमदार विजय रहागंडाले, माजी खा. डॉ. खुशाल बोपचे, माजी खा. शिशूपाल पटले, नगराध्यक्ष अशोक इंगळे,  माजी आ. खोमेश्वर रहांगडाले, भेरसिंग नागपुरे, प्रदेश कार्यकारणी सदस्य विनोद अग्रवाल,रमेश कुथे, माजी जिप अध्यक्ष नेतराम कटरे, जिल्हा महामंत्री संघटन विरेंद्र अंजनकर, नगर परिषद उपाध्यक्ष शिव शर्मा, नंदकुमार बिसेन,गोरेगावचे नगराध्यक्ष आशिष बारेवार,रेखलाल टेंभरे,चिंतामण रहागंडाले,ड़ाॅ.लक्ष्मण भगत,दिपक कदम,अमृत इंगळे,रतन वासनिक,युवा मोर्चा अध्यक्ष पंकज रहागंडाले आदी उपस्थित होते. याप्रसंगी शहरात जागोजागी हार, पुष्पगुच्छ देऊन व मिठाई वाटून त्यांचे स्वागत करण्यात येत होते. ढोल, ताशे व डीजेच्या गजरात भाजपचे झेंडे घेऊन कार्यकर्ते नारे देत होते. यावेळी स्वागतासाठी भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते त्याचबरोबर अनेक संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...