गोंदिया,दि.28 : सडक-अर्जुनी तालुक्यांतर्गत येणाऱ्या डव्वा असलेल्या पुलावरून ट्रॅक्टर पडून चार मजुरांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना आज रविवारी सकाळी 9 वाजता घडली.
मजूर घेऊन जाणार्या ट्रॅक्टरला मागून दुसर्या ट्रॅक्टरने धडक दिल्याने समोरचा ट्रॅक्टर पुलाखाली पडला. सदर घटनेची माहिती मिळताच आमदार राजकुमार बडोले यांनी पोलीस अधिकारी व आरोग्य अधिकारी यांच्याशी संपर्क साधून तपास यंत्रणा व रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी पाठविण्याचे निर्देश दिले.
अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीमार्फत एक लाख रुपये आणि जखमी व्यक्तींना 50 हजार रुपये देण्याची घोषणा आमदार राजकुमार बडोले यांनी केली.
No comments:
Post a Comment