सालेकसा,दि.22ः-गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यांतर्गत येणार्या हाजरा फॉल येथे आपल्या 3 मित्रासोंबत वाढदिवस साजरा करायला गेलेल्या गोंदियाच्या मरारटोली निवासी हेमंत लाटे वय (18) वर्ष या युवकाचा रविवराला सायंकाळी हाजराफाॅलच्या धबधब्यात बुडाल्याची घटना घडली.
सदर माहिती घटनेची माहिती लगेच सालेकसा पोलीस ठाण्याला व पोलीस नियंत्रण कक्ष गोंदियाला देण्यात आली.युवकाचा शोध घेण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाने रात्रीला शोध कार्य केल्यानंतरही काही शोध न लागल्याने शोध कार्य थांबविण्यात आले होते.आजसोमवारला पुन्हा सकाळी शोध कार्य सुरु करण्यात आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख राजन चौबे यांनी दिली आहे.
No comments:
Post a Comment