भोपाळ,दि.21 - राज्यात गाजलेल्या मालेगाव बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी आणि भारतीय जनता पक्षाच्या भोपाळमधील खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. साध्वी यांनी भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधताना म्हणाल्या, की आम्ही नाले आणि तुमचा शौचालय स्वच्छ करण्यासाठी खासदार अजिबात झालेले नाही. आम्हाला ज्या कामासाठी नेमण्यात आले ते काम आम्ही इमानदारीने करू.
साध्वी यांनी यापूर्वी अनेक वादग्रस्त विधाने करून दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नाराजी ओढवून घेतली आहे. मुंबई हल्ल्यातील कर्तव्यनिष्ठ अधिकारी हेमंत करकरे आपल्या शापाने मेले असे विधान करून ऐन लोकसभा निवडणुकीत वाद निर्माण केला होता. त्यानंतर एवढ्याच वादग्रस्त विधानावर त्या थांबल्या नाहीत. 1992 मध्ये अयोध्येत बाबरी मशीद तोडण्यात आपले योगदान असण्यावर गर्व असल्याचेही त्या म्हणाल्या होत्या.
No comments:
Post a Comment