देवरी:5
१) कंत्राट दाराच्या अनियोजीत कार्यामुळे जनतेला त्रास
२)नगरपंचायत कार्यालय व अधिकर्यांचे दुर्लक्ष
३)कामावर मजुर न येत असल्याचे कंत्राट दाराचे बहाने
देवरी शहराला विकास कामासाठी शासनाकडून करोडो रुपये दिले जातात. पण त्या विकास कामाची पायमल्ली करत देवनगरीची चिखलनगरी करायला कंत्राटदारनी कोणतीच कसरत सोडली नाही.
सविस्तर वृत्त असे की, प्रभाग क्रमांक १३ येथे मागील काही दिवसापासुन मुख्य रस्ताच्या कामाला सुरवात झाली होती त्या रस्त्यावर कंत्राटदाराकडुन अगोदर खोदकाम करन्यात आला नंतर बोल्डर टाकन्यात आले व त्यावर मुरुम टाकन्यात आले पण त्या टाकलेल्या मुरुमवर कोनतेही प्रक्रिया झाली नसल्यामुळे चिखल झाला असुन लोकानां दुचाकी तर सोडा त्या रस्त्यानी पायी सुद्धा चालता येत नाही .
सदर रस्ता गुनिलाल सहारे यांच्या घरापासुन तर नगरपंचायत च्या पानी फिल्टर पर्यंत सुरु करन्यात आले. बांधकाम सुरू असलेल्या रस्त्याची लांबी सुमारे १५० मीटर असुन,या अनियोजीत व बेजबाबदारपनाच्या कामामुळे त्या परीसरात राहणाऱ्या लोकांची चागंलिच गैरसोय होत आहे. रोजच्या होणाऱ्या त्रासामुळे परीसरातील लोकांमध्ये कंत्राटदार व नगरपंचायत विषयी रोष निर्माण झाला आहे .
पावसाला सुरुवात झाल्यामुळे कामावर मजुर येत नसल्याने व येणाऱ्या पावसामुळे काम थाबुंन असल्याचे परीसरातील लोकात चर्चा सुरु आहे. पण त्या परीसरात राहणाऱ्या लोकांनी सवाल केला की , ज्या कंत्राटदाराकडे मजुर नाही अशा कंत्राटदाराना काम का दिला ? प्रभागवासीयांना होत असलेल्या त्रासाचा जबाबदार कोण ? अशाअनेक प्रश्नांना परीसरात जोर धरला आहे .कंत्राटदार मजुर कामावर येत नसल्याचे व पाऊस येत असल्याचे बहाने करतोय. अशा चर्चा परीसरात सुरु आहेत.
या विषयाला ८ दिवस होऊनही नगरपंचायत अभियंता व प्रभागातील नगरपंचायत सदस्या भूमिता बागडे याच्या कडून कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही.
सदर रस्ता प्रभागातील मुख्य मार्ग असुन पावसाळ्याभर असेच राहील की यावर नगरपंचायत काही मार्ग काढेन यावर परीसरात चर्चेला उधाण आले आहे.

No comments:
Post a Comment