Wednesday, 3 July 2019

देवरी येथे कार्यकारी पालक शिक्षक समितीची सभा संपन्न

 देवरी: 3
समग्र शिक्षा कार्यालय गटसाधन केंद्र पंचायत समिती देवरी येथील  साने गुरुजी सभागृहात कार्यकारी पालक शिक्षक समितीची सभा बोलावण्यात आली होती. या वेळी सभेच्या अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी महेंद्र मोटघरे , शिक्षण विस्तार अधिकारी डी बी साकुरे , धनवंत कावळे विषयतज्ञ उपस्थित होते.
या वेळी तालुक्यातील सर्व खाजगी शाळेचे मुख्याध्यापक आणि कार्यकारी पालक सभेचे सभासद प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी शालेय फिस निश्चिती , दप्तराचे वजन , मोफत पाठयपुस्तके आणि विविध विषयावर चर्चा करण्यात आली.
प्रत्येक शाळेतील मुख्याध्यापक आणि समितीचे पालक यांनी पप्रश्नोत्तरे  करून माहिती मिळवून घेतली.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...