वाशिम,दि.23 : महावितरण कंपनीत कार्यरत कंत्राटी कामगारांचे प्रलंबित असलेले प्रश्न, समस्या याविरोधात कामगारांनी एल्गार पुकारला असून आज २३ जुलै रोजी वाशिम येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसून सामूहिक मुंडन आंदोलन करण्यात आले.
महावितरणमध्ये कार्यरत शिकाऊ उमेदवारांना वाढीव आरक्षण देण्यात यावे, कंत्राटी कामगारांना कायम सेवेत सामावून घ्यावे, महापारेषण, महानिर्मिती या कंपन्यांमध्ये तृतीय व चतुर्थ श्रेणीतील कामगारांची सरळ सेवा भरती प्रक्रिया राबविण्यात यावी, सरळ सेवा भरतीसाठी वयोमर्यादेत वाढ करावी, कंत्राटी कामगारांना रोजंदारी पध्दतीने कामावर घेवून शाश्वत रोजगाराची हमी द्यावी, कंत्राटी कामगारांना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार समान काम समान वेतन मिळावे, महाराष्ट्र शासन राजपत्रातील अधिसुचनेनुसार कुशल, अकुशल, अर्धकुशल कामगारांच्या किमान मुळ वेतनामध्ये वाढ करून शिकाऊ उमेदवारांचे विद्यावेतन वाढविण्यात यावे, विद्युत सहायक पद भरती करताना परिक्षा घेण्यात यावी, आदी मागण्यांसाठी कंत्राटी कामगारांनी तांत्रीक अॅप्रेंटिस, कंत्राटी कामगार संघटनेच्या नेतृत्वात मुंडन आंदोलन केले.
No comments:
Post a Comment