देवरी,दि.27 - गोंदिया शिक्षण संस्थेद्वारे संचालित मनोहरभाई पटेल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे काल शुक्रवारी (दि.26) कारगील विजय दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण झिंगरे हे होते. यावेळी प्रा, वर्षा गंगणे, प्रा.देवेंद्र बिसेन, प्राच जे पी चव्हाण, प्रा. उमेश चव्हाण ,डॉ. अभिनंदन पाखमोडे, प्रा. शुभांगी मुनघाटे आदी मान्यवर उपस्थित होते.
कारगील विजयाच्या 1999 सालच्या घटनेला उजाळा देत प्रा. झिंगरे यांनी विद्यार्थ्यांना समयोचित मार्गदर्शन केले. याप्रसंगी जसवंतसिंह यांच्या शौर्याचा इतिहास त्यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडला. यावेळी कारगील शहिदांनी श्रध्दांजली वाहण्यात आली.
कार्यक्रमाचे संचलन आणि उपस्थितांचे आभार डॉ. गंगणे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रमोद जांभूळकर, राहूल जांभूळकर, अपूर्वा नेवारे, प्राची महोबीया, मुकेश शर्मा, गायत्री गुप्ता आदींनी सहकार्य केले. यावेळी महाविद्यालयीन विद्यार्थी, प्राध्यापक आणि इतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment