रायपूर (वृत्तसंस्था),दि.06 – सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांविरोधात उघडलेल्या मोहिमेला आज मोठे यश मिळाले आहे. आज छतीसगड राज्यातील धमतरी येथे पोलीस स्पेशल टास्क फोर्स आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत चाक नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे.
चारही नक्षलवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले असून, मृत नक्षलवाद्यांकडून शस्त्रेही ताब्यात घेण्यात आली आहेत. आज सकाळच्या सुमारास धामतरी येथे पोलीस स्पेशल टास्क फोर्स आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमकीस सुरुवात झाली. यावेळी जवानांनी हा हल्ला धैर्याने परतवून लावत चार नक्षलवाद्यांना ठार केले. तर दुसरीकडे 27 मे रोजी गडचिरोली जिल्ह्यात झालेल्या नक्षल पोलीस चकमकीतील ठार झालेल्या काही नक्षलवाद्यांचे मृतदेह हाती लागल्याचेही वृत्त येत आहे.
No comments:
Post a Comment