Saturday, 20 July 2019

गोंदिया येथे मोर्च्यात जाणाऱ्या अंगणवाडी सेविकांच्या वाहनाला अपघात


जखमींचा आकडा 10 वर

 योग्य उपचाराअभावी वैद्यकीय महाविद्यालयालयाविरोधात आक्रोश


 गोंदिया, २० जुलै -गोंदिया येथे अंगणवाडी सेविकांनी काढलेल्या मोर्चात सहभागी होण्यासाठी देवरी येथून गोंदियाला येत असलेल्या अंगणवाडी सेविकांच्या वाहनाला आमगाव तालुक्यातील तिगाव जवळील जांभूळटोला येथे अपघात झाल्याची घटना शनिवारी २० जुलै रोजी १ वाजताच्या सुमारास घडली. या अपघातात ४ अंगणवाडी सेविका गंभीर तर ८ सेविका किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे. 
आमदार अग्रवाल यांनी विधानसभेच्या सभागृहात राज्यातील अंगणवाडी सेविकाबद्दल वापरलेले शब्द परत घ्यावे व सभागृहाची माफी मागावी, या मागणीला घेऊन अंगणवाडी सेविकांच्या वतीने शनिवारी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चात जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील अंगणवाडी सेविकांनी हजेरी लावली. दरम्यान, देवरी प्रकल्पांतर्गत येणाèया फूटाना बिट मधील अंगणवाडी सेविकादेखील या मोर्चात सहभागी होण्यासाठी स्कार्पियो या वाहनाने गोंदिया येथे येत होते. अशातच आमगाव तालुक्यातील तिगाव गावाजवळील जांभूळटोला येथे गोंदियाकडे येणाèया एसटी बस व स्कार्पियोमध्ये आपसात धडक झाली ज्यामध्ये तारा गावडे धमदीटोला, गायत्री पटोडी परसोडी, कौतुका सोनवाने परसोडी, निर्मला जनबंधू गडेगाव या चार अंगणवाडी सेविका गंभीर जखमी झाल्या तर मनोरमा साखरे, उर्मीला वालदे, चंद्रकला दोनोडे, तुरनबाई पुजारी, सौरुपा कोराम, ममता शिवणकर, मीरा कोराम, पुष्पा भैसारे अशी जखमीची नावे आहेत. दरम्यान, सर्व जखमींना गोंदियाच्या केटिएस जिल्हा सामान्य रुग्णालयात भर्ती करण्यात आले आहे.

केटीएसचा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर.....

अपघातानंतर सर्व जखमी अंगणवाडी सेविकांना गोंदियाच्या केटिएस जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी भर्ती करण्यात आले असता येथील अव्यवस्थेमुळे रुग्णालय प्रशासनाचे भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याचे दिसले. सिटीस्कॅन मशिनचा मुद्दा पुन्हा पुढे आला असून यामुळे अंगणवाडी सेविकांनी असंतोष व्यक्त केला.
विशेष म्हणजे रुग्णालयातील सिटीस्कॅन मशिन बंद असल्याने जखमींना खाजगी रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला. मात्र, त्यासाठी विनंती करूनही रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली नाही. यावेळी खाजगी रुग्णालयात सिटीस्कॅन करता यावा  याकरिता इतर अंगणवाडी सेविकांनी वर्गणी गोळा करून खाजगी रुग्णवाहिकेने दुसèया रुग्णालयातून सिटीस्कॅन करून घेतला. परिणामी अंगणवाडी सेविकांमध्ये रुग्णालय प्रशासनाच्या विरोधात रोष दिसून आला.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...