राष्ट्रवादीला जोर का झटका
बेरारटाईम्सचे भाकित खरे ठरले.
बेरारटाईम्सचे भाकित खरे ठरले.
गोंदिया,दि.19- भंडारा- गोंदिया जिल्ह्यातील सहकारी क्षेत्रात नावाजलेल्या आणि राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या दि भंडारा अर्बन सहकारी बॅंकेचे संचालक यांनी अखेर राष्ट्रवादी कॉंग्रेसला बायबाय करीत राष्ट्रवादी पक्षासह देशातील हैवीवेट नेते खासदार प्रफुल पटेल यांना जोर का झटका अखेर दिलाच. श्री जैन यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसला सुरुंग लावत पक्षाचे सात आणि अन्य 3 सदस्यासंह मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांचे उपस्थितीत मुंबई येथे भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला. उल्लेखनीय राष्ट्रवादीला सहकार क्षेत्रात मोठा हादरा देत त्यांच्या ताब्यातील बॅंकेचे संचालक हे भाजपच्या संपर्कात असल्याचे वृत्त सर्वप्रथम साप्ताहित बेरारटाईम्स न्यूज पोर्टलवर प्रकाशित झाले होते. या वृत्ताने सर्वत्र खळबळ उडाली होती.
काल मुंबई येथे राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांचे उपस्थितीमध्ये राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांचे मार्गदर्शनाखाली भंडारा अंर्बन बॅंकेचे अध्यक्ष महेश जैन, विलास काटेखाये, हिरालाल बांगडकर, लीलाधर वाडीभस्मे, उदय डोरले, पांडुरंग खटीक, उदय मोगलवार, कविता लांजेवार आदींनी अधिकृत भाजप प्रवेश केला. यावेळी आमगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय पुराम आणि भाजपचे जिल्हा संघटनमंत्री वीरेंद्र अंजनकर यांची प्रमुख उपस्थिती होता. राज्याच्या विधान सभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा भाजपचा मोठा विजय असल्याची बोलले जात आहे.
No comments:
Post a Comment