देवरी,दि.29- स्थानिक मनोहरभाई पटेल हायस्कूल परिसरात राहणाऱ्या एका 12 वर्षीय मुलीच्या तिच्या राहत्या घराजवळून अपहरण करण्याचा प्रयत्न काल रविवारी (दि.28) सकाळी साडे दहाच्या सुमारास करण्यात आला. मात्र, मुलीने प्रसंगावधान दाखवत स्वतःची सुटका करून घेतली.
सविस्तर असे की, काल सकाळी साडे दहाच्या सुमारास दोन अज्ञात युवक तोंडावर फडके बांधून मोटार सायकलने मनोहरभाई पटेल हायस्कूलच्या मागील परिसरात आहे. तेथे आपल्या घराजवळ असलेल्या एका 12 वर्षीय मुलीला बळजबरीने उचलून आपल्या दुचाकीवर बसविले आणि चिचगड मार्गावरून जंगलाच्या दिशेने धूम ठोकली. मात्र, परसटोला येथील नवविभागाच्या नाक्याजवळ पोचताच मुलीने प्रसंगावधान राखून एका युवकाच्या हाताचा चावा घेत स्वतःची सुटका करवून घेतली. सुटका होताच मुलीने परसटोला येथील आपल्या मैत्रीच्या घरी त्या पिडीत मुलीने आसरा घेवून आपल्या पालकांनी या घटनेची सूचना दिली. वडील आणि आजी पोचल्यावर सदर मुलीने तिच्या जवळील मोबाईलचे सीम आणि इतर साहित्य हिसकावून झुडूपात फेकल्याचे सांगितले. या घटनेची तक्रार देवरी पोलिसांत करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
No comments:
Post a Comment