Sunday 21 July 2019

सध्आ भाजपमध्ये जोरदार इमकमिंग सुरू आहे- मुख्यमंत्री फडणवीस


मुंबई: सध्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीतून भाजपमध्ये जोरदार इनकमिंग होत आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीत भाष्य केले. दुसऱ्या पक्षातही बरीच चांगली माणसे आहेत. त्यांच्यातील काही निवडक मंडळी घ्यावी लागतात. त्यामध्ये वाईट मानून घेण्याचे काहीच कारण नाही, असे विधान मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांसमोर बोलताना केले.
काँग्रेस, राष्ट्रवादीतून अनेक मंडळी भाजपमध्ये येत आहेत.त्यामुळे पक्षातील निष्ठावानांवर अन्याय होत असल्याची काहींची भावना होत आहे. या मुद्द्याला स्पर्श करत मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांना विचलित न होण्याचा सल्ला दिला. 'भाजप प्रायव्हेट लिमिटेड पक्ष नाही, तर ती पब्लिक अनलिमिटेड पक्ष आहे. भाजपचं राजकारण पाहून विरोधी पक्षातील अनेक चांगल्या लोकांना पक्षात यायचं आहे. त्यांच्यातील निवडक मंडळी घ्यावी लागतात. त्यामागे वाईट वाईट वाटून घेण्याचे कारण नाही', असं मुख्यमंत्री म्हणाले. 

निवडणुकीवेळी भाजपत उड्या मारणाऱ्या नेत्यांना तिकीटं दिली जातात, अशी टीका अनेकदा होते. मात्र यामध्ये तथ्य नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. 'विरोधी पक्षातील चांगली माणसं पक्षात येतात. मात्र गेल्या निवडणुकीत ८५ टक्के तिकीटं पक्षातील लोकांनाच मिळाली. त्यामुळे कार्यकर्त्यांनी अजिबात विचलित न होता विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागावं' अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली. 

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...