Sunday, 21 July 2019

भरधाव एसटीला अपघातः 5 प्रवाशी जखमी



गोंदिया चिखलाने माखलेल्या रस्त्यावरून भरधाव एसटी घसरून झालेल्या अपघातात पाच  प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची घटना आज सकाळी 7 वाजता घडली. 
 जखमींमध्ये राज बिसेन (13) बाळापूर, समुर बिसेन (13) डोंगरगाव, तारेंद्र रहांगडाले (13) डोंगरगाव, हिमानी उके (13)  सुकडी व इतरांचा समावेश आहे. 
सविस्तर असे की, तिरोडा आगाराची एसटी क्र एमएच 40 - 9874 आपली पहिली फेरी सुकडी ते तिरोडा सकाळी 7 वाजताच्या सुमारास धावत होती. मलपुरी ते गराडा दरम्यान रस्त्यावर पसरलेल्या चिखलामुळे भरधाव एस टी रस्त्यावरून घसरू लागली. चालकाने वेळीच नियंत्रण बसविल्यामुळे एसटी रस्त्याखाली उतरली. यात 5 प्रवासी किरकोळ जखमी झाले. एसटी त सुमारे 35 प्रवासी प्रवास करीत होते. दरम्यान, एसटी आगाराला कळवूनही दोन तासांपर्यंत मदत वाहन पाठविण्यात आले नव्हते. याबाबत प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...