Wednesday 10 July 2019

देवरी येथिल ३ आरोपी #अल्पवयीन बालक रौनकच्या ५ अपहरणकत्र्यांना अटक

गोंदिया,दि.१०ः- डुग्गीपार पोलीस ठाणेंतर्गत येत असलेल्या घटेगाव येथील जिल्हा परिषद शाळेचा ७ वर्षीय विद्यार्थी रौनग गोपाल वैद्य याच्या ५ अपहरणकत्र्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केल्याची माहिती पोलीस अधिक्षक विनिता साहू यांनी आज पत्रपरिषदेत दिली.

अटक करण्यात आलेल्या अपहरणकत्र्या तरुणामध्ये वैभव प्रकाश वासनिक व शेखर दुलीचंद शेंडे हे दोन्ही राहणार घटेगाव,ता.सडक अर्जुनी यांना पांढरी येथून तर प्रविण कैलास पाटील,राहुल नामाजी गावड व सौरभ बालकृष्ण गायधने तिघेही राहणार देवरी,ता.देवरी यांना नागपूर येथून ९ जुर्ले रोजी अटक करण्यात आली.या अपहरणकांडातील मुख्य सुत्रधार देवरी येथील प्रविण कैलास पाटील हा तरुण असून याची आई अंगणवाडीसेविका तर वडिल सेवानिवृत्त शिक्षक आहेत.तर मुलाला शाळेतून गाडीवर नेणाèया राहुल नामाजी गावड व सौरभ बालकृष्ण गायधने यांचा समावेश होता राहुल हा पोलीस कर्मचाèयाचा मुलगा आहे.विशेष म्हणजे या ५ आरोपीमधील एक तरुण हा एमबीए करीत आहे.तर दोघे हे आयटीआयचा शिक्षण घेत आहेत.तर दुसरे दोघांचा १२ वी पर्यंत शिक्षण झाले असल्याची माहिती पोलीस अधिक्षक साहू यांनी दिली.
रौनकचे ३ जुर्ले रोजी अपहरण झालेले होते.पोलीसांनी लगेच याप्रकरणात नाकाबंदी करुन शोध घेण्यास सुरवात केल्याने अपहरकत्र्यांचे धाबेदणाल्याने त्यांनी ४ जुर्ले रोजी रौनकला देवरी तालुक्यातील पुतळी गावाजवळील जंगलपरिसरात सोडून दिले होते.त्यानंतर अपहरणकत्र्यांचा शोध घेण्यासाठी पाच शोधपथके तयार करण्यात आली होती.तपासादरम्यानच घटेगावातील काही नागरिक तसेच अपहृत बालकाने केलेल्या वर्णनांच्या आधारे तपासाला सुरवात केल्यावर घटेगावातील २ व देवरीतील ३ तरुणांच्या हालचाली संशयास्पद वाटल्या तसेच सदर घटनेनंतर हे तरुण गावातून पसार झाल्याचे समोर आल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या ३ वेगवेगळ्या पथकाने या तरुणांच्या शोधास सुरवात केली असता दोघांना डुग्गीपार पोलीस ठाणेतंर्गत पांढरी येथून तर तिघांना नागपूर येथून अटक करण्यात आली.सदर तरुणांनी खंडणीच्या उद्देशाने बालकाचे अपहरण केले होते.बालकाच्या वडीलाचे रेशनचे दुकान असून ते कंत्राटदार असल्याने त्याच्याकडून पैसा मिळेल व आपली चणचण भागेल या उद्देशाने अपहरण केल्याचे त्यांनी कबुल केल्याचे सांगत छत्तीसगडमध्ये जाऊन मुलाच्या वडीलाला फोन करुन रक्कमेची मागणी करणार होते अशी माहिती दिली.पकडलेल्या तरुणामध्ये एकाने आपल्या गाडीने अपघात झाल्याने त्याचे पैसे,तर एकाने शाqपगकरीता,एकाला बहीणीची शाळेची फी भरायची असल्याने पैशाची गरज असल्यामुळे मुलावर गेल्या काही दिवसापासून वैभव वासनिक च्या माध्यमातून नजर ठेवून होते.घटनेच्यादिवशी मुलाच्या अपहरणानंतर पोलीसांची वाढलेली गर्दी व तपासयंत्रणाचा दबाव बघून घटेगाव येथील मुलाच्या शेजारी राहणारा वैभव वासनिकने देवरीतील मित्रांना फोन करुन माहिती दिली.त्या मुलाला गाडीवर बसविल्यानंतर देवरी येथील प्रविण पाटील यांच्या घरच्या वरच्या माळ्यावर ठेवण्यात आले होते.रात्रभर तिथे ठेवल्यानंतर सकाळी त्या मुलाला जेवण दिल्यानंतर आपण फसणार अशी कल्पना आल्याने त्यांनी पुतळी मार्गावर असलेल्या तलावानजीकच्या जंगलात पोत्यामध्यमध्ये भरुन सोडून दिल्याची माहिती तपासात आरोपींनी दिली असून अजून तपास सुरु असल्याचे सांगितले.
अपहरणकत्र्यांना पकडण्यासाठी पोलीस अधिक्षक विनिता साहू,पोलीस अप्पर अधिक्षक संदिप आटोळे यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढाले,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक दिनकर ठोसरे,सहा.पोलीस निरिक्षक प्रदिप अतुलकर,रमेश गर्जे,प्रमोद बघेले,पोलिस कर्मचारी लिलेंद्र बैस,गोपाल कापगते,नेवालाल भेलावे,सुखदेव राऊत,विजय रहागंडाले,चंद्रकात कर्पे,राजकुमार पाचे,भुवनलाल देशमुख,राजेश बढे,रेखलाल गौतम,विनय शेंडे,ओमकार गौतम,पंकज खरबडे,qचतरजंन कोडापे,अजय रहागंडाले.चालक विनोद गौतम,सायबर सेल पोलिस निरिक्षक राहुल शिरे,पोलिस कर्मचारी दिक्षितकुमार दमाहे,प्रभाकर पालादुंरकर,विनोद बरैय्या,मोहन शेंडे,डुग्गीपार पोलीस निरिक्षक विजय पवार यांच्या पथकाने काम केले.कमी वेळात आरोपींना ताब्यात घेऊन या पथकाने उल्लेखनिय कामगिरी केली आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...