परभणी,दि.21 – जिल्ह्यातील इलेक्ट्रॉनिक मीडियाचे निर्भिड व जनहीतवादी पत्रकार तसेच टीवी 9 या वृत्तवाहिनेचे जिल्हा प्रतिनिधी आणि स्थानिक पत्रकार सलीम इस्माईल शेख यांचे आज रविवारी (दि.21) दुपारी दुःखद निधन झाले.मृत्यू समयी ते 42 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात 1 मुलगा,3 मुली,पत्नी, आई-वडील भाऊ बहिणी असा परिवार आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांना काविळ या आजाराने ग्रासले होते. उपचार करण्यासाठी त्यांना हैद्राबादला हलविण्यात आले. सुरुवातीला त्यांच्यावर हैद्राबाद येथील एआयजी रुग्णालय आणि त्यानंतर उस्मानिया रुग्णालयात उपचार करण्यात आले. मात्र उपचाराला प्रतिसाद न मिळाल्याने अखेर आज हैद्राबादच्या उस्मानिया रुग्णालयात दुपारी 3 च्या सुमारास त्यांची प्राणज्योत माळवली. पत्रकार सलीम शेख यांच्या अचानक निधनाने परभणी जिल्ह्यासह राज्यातील त्यांच्या पत्रकार मित्र परिवारातून हळहळ व्यक्त होत आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
गोंदिया : ओबीसी प्रवर्गातील अनेक विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळू शकल्याने व शहरात राहण्याची इतर सोय नसल्याने शिक्षणापासून वंचि...
-
देवरी येथे सर्ववर्गीय कलार समाज संमेलन थाटात देवरी,दि.03- कोणत्याही समाजाची प्रगती ही त्या समाजाच्या शैक्षणिक, अर्थिक आणि राजकीय स्थित...
No comments:
Post a Comment