गोंदिया : पशुसंवर्धन विभागातर्फे नाविण्यपूर्ण
योजनेअंतर्गत दुधाळ गाई/म्हशींचे गट वाटप, शेळी/मेंढी गट वाटप व मांसल कुक्कुट
पालनाची योजना सर्वसाधारण, अनुसूचित जाती तसेच अनुसूचित जमाती प्रवर्गातील
लाभार्थ्यांसाठी राबविण्यात येत आहे. या योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन पध्दतीने https://ah.mahabms.com या संकेतस्थळावर 18
वर्षावरील अर्जदारांकडून 25 जुलै ते 8 ऑगस्ट 2019 या कालावधीत अर्ज ऑनलाईन
पध्दतीने मागविण्यात येत आहेत. योजनेची संपूर्ण माहिती व अर्ज करण्याची
कार्यपध्दती बाबतचा संपूर्ण तपशिल https://ah.mahabms.com या
संकेतस्थळावर व गुगल प्ले स्टोअरवरील AH MAHABMS या मोबाईल
ॲपवर उपलब्ध आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पध्दतीनेच स्विकारले जातील याची संबंधितांनी
नोंद घ्यावी.
तरी इच्छुक
अर्जदारांनी नमूद विहित कालावधीत ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावेत. अर्ज भरतांना
अर्जदाराने नोंदविलेल्या भ्रमणध्वनी क्रमांकावर अर्जाच्या स्थितीबाबत
एस.एम.एस.द्वारे संदेश पाठविण्यात येणार असल्याने कोणत्याही परिस्थितीत अर्जदाराने
आपला भ्रमणध्वनी क्रमांक योजनेअंतर्गत अंतिम निवड होईपर्यंत बदलू नये. अर्जदाराची
प्राथमिक निवड अर्जदाराने ऑनलाईन अर्जात नमूद केलेल्या माहितीनुसार संगणकाद्वारे
करण्यात येणार असली तरी अंतिम निवड ही अर्जदाराने अपलोड केलेल्या कागदपत्रांच्या
आधारेच करण्यात येईल याची नोंद घ्यावी. योजनेबाबत अधिक माहितीसाठी तालुक्याचे
पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती अथवा जिल्हा पशुसंवर्धन
उपआयुक्त,गोंदिया यांचेशी संपर्क साधावा.
No comments:
Post a Comment