रायपूर(वृत्तसंस्था)दि.23ः- छत्तीसगड राज्यातील सुकमा येथे सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये आज मंगळवारी (23 जुलै) झालेल्या चकमकीत एका नक्षलवाद्याचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे.
नक्षलवाद्याकडील शस्त्रसाठा जप्त केला आहे. खात्मा करण्यात आलेल्या नक्षलवाद्यावर एक लाखाचे बक्षीस होते. मडकम हिडमा असे नक्षलवाद्याचे नाव असून परिसरात सध्या शोधमोहीम सुरू आहे. सुकमाचे पोलीस अधीक्षक शालभ सिन्हा यांनी दिलेल्या माहितीनुसार, डीआरजीचे जवान आणि नक्षलवादी यांच्यामध्ये आज सकाळी चकमक झाली. या चकमकीत एक लाखाचे बक्षीस असलेल्या मडकम हिडमा या नक्षलवाद्याचा खात्मा करण्यात यश आले आहे. घटनास्थळावरून जवानांनी शस्त्रसाठा देखील जप्त केला आहे. नक्षलविरोधी मोहीमेचे उप-महानिरीक्षक पी सुंदरराज यांनी दिलेल्या माहितीनुसार, राजधानी रायपूरपासून जवळपास 500 किलोमीटर अंतरावरील बिरभट्टी गावाजवळील जंगलात डीआरजीचे पथक शोधमोहिमेवर निघालेले होते. त्याच दरम्यान लपलेल्या नक्षलवाद्यांकडून गोळीबार सुरू करण्यात आला. जवानांनी देखील त्या गोळीबाराला चोख प्रत्तुत्तर दिले. यामध्ये काही जण जंगलात पळून गेले. तर घटनास्थळी एका नक्षलवाद्याचा मृतदेह आढळून आला. मडकम हिडमावर एक लाखाचे बक्षीस होते. सध्या या परिसरात शोधमोहीम सुरू आहे.
No comments:
Post a Comment