डोंबिवली-रिक्षाचालकाचे अपहरण करुन जबर मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीत घडली आहे. याप्रकरणी भाजपच्या रिक्षा युनियनच्या पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बाबासाहेब कांबळे असे मारहाण झालेल्या रिक्षाचालकाच नाव आहे. तो डोंबिवली पूर्वेच्या शेलार नाका परिसरात राहतो. शनिवारी रात्री त्याला काही जणांनी जानकी हॉटेल परिसरातून रिक्षात उचलून नेल्याची माहिती त्याच्या कुटुंबियांना मिळाली. त्यामुळे त्याचा भाऊ सिद्धार्थ याने घटनास्थळी धाव घेतली असता त्याचा भाऊ बाबासाहेब कांबळे हा रक्तबंबाळ अवस्थेत शेलार नाक्यावर पडलेला आढळून आला. भाजपच्या रिक्षा युनियनचे पदाधिकारी दत्ता माळेकर, रवी माळेकर आणि त्यांच्या साथीदारांनी आपल्याला अपहरण करून उचलून नेले आणि अज्ञातस्थळी नेऊन रॉड, वायरने मारहाण केल्याची माहिती कांबळेने दिली.
No comments:
Post a Comment