Tuesday, 2 July 2019

ईर्रीटोला शाळेच्या मुख्याध्यापिकेची पतीनेच केली हत्या

गोंदिया,दि.02 जुर्ले - तालुक्याच्या ईर्री येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत मुख्याध्यापिकेची हत्या पतीनेच केल्याची घटना आज सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास घडली.त्यामुळे शाळेत व गावात एकच खळबळ माजली आहे. मुख्याध्यापिका प्रतिभा दिलीप डोंगरे (५१) यांचा कुऱ्हाडीने घाव घालून पती दिलीप डोंगरे यांनीच हत्या केल्याचे बोलले जात आहे. घटनास्थळी गोंदिया ग्रामीण पोलीस दाखल झाले असून पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.गेल्या काही दिवसापासून मुख्याध्यापिका असलेल्या पत्नीसोबत दिलीप डोंगरे यांचे भांडण सुरु होते.त्यामुळे ते एकमेकापासून विभक्त होत वेगवेगळे राहत होते.मुख्याध्यापिका या दतोरा या गावात काही दिवसापुर्वीच राहायला गेल्या होत्या अशी माहिती समोर आली आहे.या घटनेने आजुबाजूच्या गावात सुधद्ा दहशत पसरली आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...