आतातरी जूनी पेंशनप्रकरणी सरकार गांभीर्याने लक्ष देणार काय?
गोंदिया,दि.8- राज्य सरकारी कर्मचारी व मध्यवर्ती संघटनांच्या मार्गदर्शनात राज्य सरकारी कर्मचारी यांना 1982 -84 ची जुनी पेन्शनसह इतर मागण्या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयासह जिल्ह्यातील सर्व तालुक्याच्या ठिकाणी गेल्या 3 जुलै रोजी लक्षवेधी निदर्शने करण्यात आली.
उल्लेखनीय म्हणजे राज्यात एकाच दिवशी जिल्ह्यातील व तालुक्यातील विविध कार्यालयातील सर्व कर्मचारी एकत्र येऊन नवीन पेन्शन योजना रद्द करून म.ना.अ. 1982 -84 ची जुनी पेन्शन योजना लागू करणे, ही मुख्य मागणी घेऊन व इतर प्रलंबित मागण्या संदर्भात संपूर्ण गोंदिया जिल्ह्यामध्ये लक्षवेधी धरणे व उग्र निदर्शने करण्यात आले. यावेळी जुनी पेन्शन योजना लागू करावी याबाबत घोषणा देण्यात आली.
जर शासनाने या आंदोलनाची दखल घेतली नाही तर 20 ऑगस्ट पासून कामबंद आंदोलन करण्याचा इशारा या माध्यमातून जिल्हाधिकारी मार्फत मा.मुख्यमंत्री यांना निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आला आहे.
यावेळी जिल्ह्यातील सर्व सरकारी व निमसरकारी संघटनेचे वितेश खांडेकर राज्याध्यक्ष-महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटन,लिलाधर पाथोडे जिल्हा सरचिटणीस मध्यवर्ती संघटना तथा निमंत्रक -समन्वय मिती, संदीप सोमवंशी राज्यप्रसिद्धी प्रमुख महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटन, राज कडव जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटन गोंदिया, मुकेश रहांगडाले जिल्हासहकार्याध्यक्ष, प्रकाश ब्राम्हणकर विभागीय अध्यक्ष शिक्षक भारती, पी जी शहारे अध्यक्ष महासंघ गोंदिया, कमलेश बिसेन, अजय खरवडे, गुणवंत ठाकूर, बी डी नेवारे, एल आर ठाकरे, आशिष रामटेके, मदन चुऱ्हे,अश्विन भालाधरे, किशोर डोंगरवार, एल यू खोब्रागडे,आदी पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment