नागपूर, दि.27 -मद्यप्राशन करून वाहन चालविणार्या ३0 वाहनचालकांचे परवाने सहा महिन्यांसाठी निंलबित करण्यात आले. त्याचप्रमाणे एका वाहनचालकाचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याचा आदेश मोटर वाहन न्यायालयाचे न्यायाधीश शहजाद परवेज यांनी दिले आहेत.
अपघातात निष्पाप लोकांचा बळी जातो. त्यात बहुतांश वाहनचालक हे मद्यप्राशन करून वाहन चालवित असल्याचे दिसून आले. मद्यपी वाहनचालकांवर जास्तीतजास्त कारवाई करून त्यांच्यावर प्रतिबंध घालणे आवश्यक होते. या वाहनचालकांना शोधण्यासाठी विशेष कार्यप्रणाली विकसित करण्यात आली आहे. त्यामुळे एकापेक्षा जास्त गुन्हे करणार्यांना शोधणे सुलभ झाले आहे. या वाहनचालकांवर न्यायालयात आरोपपत्र दाखल करताना यापूर्वीही त्यांच्यावर कारवाई झाल्याचे पुराव्यासह न्यायालयाच्या लक्षात आणून देण्यात येत आहे.
सीताबर्डी वाहतूक शाखेतर्फे नियमितपणे विशेष मोहीम राबवून मद्यपी वाहनचालकांची धरपकड करण्यात आली. त्यावेळी या मद्यपींनी यापूर्वी केलेले गुन्हे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. न्यायाधीश शहजाद परवेज यांनी यातील ४ मद्यपी वाहनचालकांना ५ हजाराचा दंड ठोठावून एका वाहनचालकाचा परवाना ६ महिन्यांसाठी निलंबित करून त्याला कोर्ट उठेपयर्ंत शिक्षा सुनावली. यानंतरही हा वाहनचालक मद्यप्राशन करून वाहन चालविताना आढळल्यास नेहमीसाठी त्याचा परवाना रद्द करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
तर कायमस्वरूपी परवाना रद्द
शहरातील ३0 मद्यपींचा परवाना पुढील सहा महिन्यांसाठी निलंबित करण्यात आला आहे. चारपेक्षा जास्त वेळ एखाद्या मद्यपी मद्यप्राशन करून वाहन चालविताना मिळून आल्यास त्याचा कायमस्वरूपी परवाना रद्द करण्याचे आदेश न्यायाधीश परवेज यांनी दिले.
No comments:
Post a Comment