आमगाव,दि.19 : तालुक्यातील बोरकन्हार येथे १७ जुलै रोजी विद्यार्थिनीच्या प्रेमसंबंधाचा लाभ उचलत शरीरसुखाची मागणी केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी आमगाव पोलिसांनी शिक्षकासह विद्यार्थिनीच्या प्रियकरावर गुन्हा दाखल केला आहे.
बोरकन्हार येथील १६ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीने आमगाव येथील जिप शाळेतून इयत्ता दहावीची परीक्षा गुणवत्ता श्रेणीत उत्तीर्ण केली होती. २६ जानेवारी रोजी तिचा शाळेत सत्कार होत असताना अमराईटोला येथील प्रदिप नावाच्या युवकाशी ओळख झाली. ओळखीचे रुपांतर मैत्री व प्रेमात झाले. त्यानंतर प्रदिपने अनेकदा तिच्याशी शारीरिक संबंध केले. दरम्यान, भंडारा येथील रहिवासी व बोरकन्हार येथील एका शाळेच्या शिक्षकाला त्यांच्या प्रेमसंबंधाची माहिती झाली. व त्याने याचा लाभ उचलत विद्यार्थिनीला वारंवार मोबाईलवरुन अलि संदेश पाठवून तसेच पाठलाग करुन शरीरसुखाची मागणी केली. या त्रासाला कंटाळून तिने १७ जुलै रोजी आमगाव पोलिसात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी प्रियकर व शिक्षकावर गुन्हा दाखल केला आहे.
No comments:
Post a Comment