गोंदिया,दि..08ः-विदर्भ ऑटोरिक्षा चालक फेडरेशनच्या वतीने मंगळवार, ९ जुलै रोजी पासून बेमुदत राज्यव्यापी ऑटोरिक्षा व टॅक्सी बंद पुकारण्यात आले असून येथील गोंदिया जिल्हा ऑटोरिक्षा चालक-मालक संघटना व जिल्हा काळीपिवळी परमीट टॅक्सी मालक चालक असोसिएशनच्या वतीने या बंदला समर्थन दिले आहे. तेव्हा जिल्ह्यातील ऑटोरिक्षा व टॅक्सी मालक व चालक या बंदमध्ये सहभागी होणार आहे.
दरम्यान, ऑटोरिक्षा संघटनेचे अध्यक्ष सतीश समुद्रे व टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष गोqवद तिडके यांच्या नेतृत्वात दुपारी १२ वाजता जयस्तंभ चौकातून मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात येणार आहे. ऑटोचे खुले परमीट बंद करण्यात यावे, ऑटोचालक कल्याणकारी महामंडळाची अंमलबजावणी व्हावी, वाहन विमाचे दर कमी करण्यात यावे, ओला व उबेर कंपनी बंद करा, अवैध प्रवासी वाहतूक बंद करणे, चालकाला जनसेवकाचा दर्जा मिळावा, जिल्हास्तरीय आरटीए कमिटीवर संघटनेच्या एका प्रतिनिधीला नियुक्ती देण्यात यावी, जयस्तंभ चौकात सुलभ शौचालय तयार करण्यात यावे, आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. आंदोलना जिल्ह्यातील ऑटो व टॅक्सी मालक व चालकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment