गोंदिया,दि.18ःःगोंदिया रेल्वे स्थानकावर दोन वेगवेगळ्या घटनेत रेल्वे प्रवाशांच्या किमती सामान व पैसे चोरणार्या एका इसमासह दोन अल्पवयीन बालकांना १६ जुलै रोजी रेल्वे सुरक्षा दलाने ताब्यात घेतले.
रायपूर येथील प्रवासी गोविंदा दमाहे हे बालाघाट येथे जाण्यासाठी रात्रीच्या वेळी फलाट क्र. ३ वर बसलेले असताना, शेजारी बसलेल्या इसमाने संधी साधून त्यांच्या खिशातील पैशाचे पाकीट चोरी केले. ही बाब लक्षात येताच त्यांनी रेल्वे पोलिसात तक्रार केली. रेल्वे पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेराच्या पाहणी करुन रेल्वेस्थानकावर शोध मोहिम राबविली असता संशयास्पदरित्या वावरणार्या मनीष मन्नू कुलदीप रा. गोंदिया याला ताब्यात घेतले व चौकशी दरम्यान त्याने गुन्हा कबुल केला. तर दुसर्या घटनेत अजित संतोष बैरागी, मोनू राजेंद्र सिन्हा रा. रायपूर हे फलाट क्रमांक ४ वर इतवारी-रायपूर पैसेंजरमध्ये प्रवाशांच्या साहित्याची छेडछेड करताना आढळले. रेल्वे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी प्रवाशांचे साहित्य व पैसे चोरी करीत असल्याचे कबूल केले. दोन्ही प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment