Tuesday, 23 July 2019

मुख्यमंत्र्यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात माहिती लपविली; सुप्रीम कोर्टाने निकाल राखला

Image result for फडणवीस मुख्यमंत्रीनवीदिल्ली.दि.23 - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी होऊन सुप्रीम कोर्टाने आज, मंगळवारी निवाडा राखून ठेवला. विधानसभा निवडणूक प्रतिज्ञापत्रात दोन गुन्हेगारी प्रकरणांची माहिती लपविल्याचा आरोप करत या प्रकरणी अॅड. सतीश उके यांनी याचिका दाखल केली होती. या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सर्वोच्च न्यायालयाने नोटीस देखील बजावली होती.  
मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीवेळी प्रतिज्ञापत्रात माहिती लपविल्याप्रकरणी सतीश उके यांनी दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली होती. या निर्णयाविरोधात त्यांनी सर्वोच्च न्यायालयात अपील केले होते. त्यावर खंडपीठाने निकाल राखून ठेवला आहे.
२०१४ मधील विधानसभा निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात दोन गुन्हे प्रकरणांची माहिती लपविल्याचा आरोप याचिकेतून केला आहे. या दोन प्रकरणांची नोंद १९९६ आणि १९९८ मध्ये झाली होती. मात्र, आरोप निश्चित झाला नव्हता. यातील एक गुन्हा फसवणुकीचा आहे. हे गुन्हे लपवून प्रतिज्ञापत्र सादर केल्याचा उके यांचा दावा आहे. 
या प्रकरणी सुनावणी होऊन सरन्यायाधीश रंजन गोगाई यांच्या नेतृत्वाखालील न्यायमूर्ती दीपक गुप्ता आणि अनिरुद्ध बोस यांच्या खंडपीठाने निकाल राखून ठेवला. वरिष्ठ वकील मुकूल रोहतगी यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची तर विवेक तन्खा यांनी याचिकाकर्ते सतीश उके यांची बाजू मांडली.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...